शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यांत १३०० हून अधिक लोकसेवकांना अटक

By admin | Updated: December 10, 2015 02:57 IST

२०१५ वर्षामध्ये १० महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे १०५० प्रकरणांमध्ये १३०० हून अधिक शासकीय लोकसेवकांना अटक करण्यात आली आहे.

नागपूर : २०१५ वर्षामध्ये १० महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे १०५० प्रकरणांमध्ये १३०० हून अधिक शासकीय लोकसेवकांना अटक करण्यात आली आहे. यातील ५६ प्रकरणांमध्ये अभियोग दाखल करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली आहे. विधान परिषदेत रामराव वडकुते, दीपकराव साळुंखे-पाटील, ख्वाजा बेग यांच्यासह इतर आमदारांनी राज्यातील विविध विभागांतील लाचप्रकरणांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. १ जानेवारी २०१५ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत लाचप्रकरणांत विविध खात्यांतील १,३६२ शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. १०५० पैकी ४५० प्रकरणांत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १६६ प्रकरणांमध्ये अभियोग दाखल करण्यास मंजुरी प्राप्त झालेली नाही. तर ३७५ प्रकरणांमध्ये गुन्ह्याचा तपास चालू आहे, अशी माहिती लेखी उत्तरात नमूद करण्यात आली.साडेतीन वर्षांत १४६ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईदरम्यान, २०१२ ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे १४६ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यात मुंबई परिक्षेत्राअंतर्गत ४७, पुण्यातील ३९ तर औरंगाबाद क्षेत्रातील २५ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कण्यात आल्याची माहिती लेखी उत्तरातून देण्यात आली.