शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

मोनोचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 02:13 IST

संत गाडगे महाराज चौकापर्यंत धावण्याचे संकेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिले असले तरी त्याला अद्यापही डिसेंबरपर्यंत अवकाश आहे.

मुंबई : चेंबूर ते वडाळा या मार्गावर धावणारी मोनोरेल आता वडाळा ते महालक्ष्मी येथील संत गाडगे महाराज चौकापर्यंत धावण्याचे संकेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिले असले तरी त्याला अद्यापही डिसेंबरपर्यंत अवकाश आहे. कारण मोनोच्या दुसऱ्या टप्प्यातील बहुतांश कामे शिल्लक असून, आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही कामे मार्गी लागतील, असा दावा प्राधिकरणाने केला आहे. आणि त्यानंतर कुठे डिसेंबर अखेरपर्यंत दुसऱ्या टप्प्यावर मोनो कार्यान्वित होईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गासह चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौकापर्यंतच्या मोनोरेल प्रकल्पांचे काम हाती घेतले. यातील घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मेट्रोला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला. तर प्राधिकरणाने मोनोरेलचे काम दोन टप्प्यांत विभागले. यातील चेंबूर ते वडाळा असा पहिला टप्पा प्राधिकरणाने पूर्णही केला. आता मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. मात्र मोनोच्या पहिल्या टप्प्याला प्रवाशांकडून फार प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, मोनो तोट्यातच धावत राहिली. मोनोचा पहिला टप्पा म्हणजे चेंबूर ते वडाळा हा मार्ग कोणत्याच रेल्वे स्थानकाशी जोडण्यात आला नसल्याने प्रवाशांनी याकडे पाठ फिरवली. शिवाय या मार्गावर वसाहत वगळता फारशी कार्यालये नसल्याने चाकरमान्यांनी मोनोला अल्प प्रतिसाद दिला. परंतु मोनोच्या दुसऱ्या टप्प्यात महालक्ष्मी, करी रोडसारखी रेल्वे स्थानके संलग्न असल्याने या टप्प्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा प्राधिकरणाने वर्तवली आहे. परिणामी, दुसऱ्या टप्प्याच्या पूर्णत्वाचे काम प्राधिकरणाकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून, दुसऱ्या टप्पा डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)>मोनोच्या दुसऱ्या टप्प्यावरील स्थानकेवडाळा, जीटीबी नगर, अ‍ँंन्टॉप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रीज, दादर पूर्व, नायगावमोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याची डेडलाइन जुलै २०१६ होती. मात्र ही डेडलाइन उलटली आहे.मोनोच्या दुसऱ्या टप्प्यावरील सिग्नल आणि संवाद यंत्रणा आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर मोनोरेलची चाचणी घेण्यात येईल.रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मोनोचा दुसरा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.