शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

पॉर्न फिल्म दाखवल्यानंतर बलात्कार करून मोनिक घुरडेचा खून - आरोपीची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2016 09:32 IST

पर्फ्युम स्पेशलिस्ट मोनिका घुरडे हिचा खून करण्यापूर्वी राजकुमार सिंगने तिच्यावर हात बांधलेल्या स्थितीत बलात्कारही केल्याचे तपासातून उघड

पणजी : पर्फ्युम स्पेशलिस्ट मोनिका घुरडे हिचा खून करण्यापूर्वी राजकुमार सिंगने तिच्यावर हात बांधलेल्या स्थितीत बलात्कारही केल्याचे तपासातून उघड झाले. मोनिकामुळेच आपल्याला कामावरून काढल्याचा त्याचा समज झाल्यामुळे सूड भावनेने त्याने हे केल्याची कबुली दिली.वैद्यकीय तपासात मोनिकावर बलात्कार झाला की नाही, याबद्दलचा अहवाल उघड करण्यात आलेला नसला, तरी खुनापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याचे संशयिताने पोलिसी इंगा दाखविल्यानंतर कबूल केले. ५ आॅक्टोबरला संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास संशयिताने मोनिकाच्या फ्लॅटची बेल वाजविली. ‘कोण आहे,’ असे मोनिकाने विचारताच, ‘सिक्युरिटी’ असे त्याने उत्तर दिले. त्यामुळे मोनिकाने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच राजकुमार घरात घुसला आणि चाकू काढून त्याने तिला धाक दाखविला. गळा कापण्याची धमकी दिली आणि नंतर तिचे हात आणि पाय बांधून ठेवले. तिने प्रतिकार थांबविल्यानंतर तिच्याकडे पैसे मागितले. तिच्या पर्समध्ये केवळ साडेचार हजार रुपयेच होते आणि त्याची मागणी मोठी होती. त्यामुळे आपले एटीएम कार्ड तिने त्याला नेण्यास सांगितले. त्याने एटीएम कार्डसह मोबाइल फोनही घेतला आणि एटीएमचा आणि मोबाइलचा पासवर्डही घेतला.तिला सोडून दिले, तर ती पोलिसांत तक्रार नोंदवेल, या भीतीनेच त्याने तिच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिचा खून केला. तत्पूर्वी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करण्यापूर्वी मोबाईलवरील ब्ल्यू फिल्म त्याने तिला सक्तीने पाहायला लावल्या, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी दिली. (प्रतिनिधी)