शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

चर्चगेटमध्ये तरुणीचा विनयभंग

By admin | Updated: July 16, 2017 01:14 IST

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत विकृतांचा मनस्ताप वाढताना दिसत आहे. बोरीवली, सीएसटीएम, पवईतील विकृतीच्या घटना ताज्या असतानाच, चर्चगेट रेल्वे स्थानकात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत विकृतांचा मनस्ताप वाढताना दिसत आहे. बोरीवली, सीएसटीएम, पवईतील विकृतीच्या घटना ताज्या असतानाच, चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शनिवारी याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या वाढत्या घटनांमुळे मुंबईतील महिला असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकात ८ जुलै रोजी एक तरुणी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर लोकलची वाट पाहत उभी होती. दरम्यान, तिथूनच एक तरुण चालत आला. तरुणीचे लक्ष लोकलकडे असल्याचे पाहून, या तरुणाने तिच्या जवळ जात तिला स्पर्श केला. तरुणी क्षणाचाही विलंब न करता, त्याच्या मागे धावत गेली आणि तिने त्याला पकडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला आरोपी काळाघोडा परिसरात बहिणीसोबत राहत होता. तो अल्पवयीन असल्याने, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. यापूर्वी बोरीवली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसटीएम) अशा वर्दळीच्या ठिकाणीही अशा घटना घडल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे मुंबईतील महिलांमध्ये असुरक्षिततेची भीती वाढत चालली आहे. सुरक्षित मुंबई गेली कुठे, असा संतप्त सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे. महाविद्यालय, रेल्वे स्थानक लक्ष्ययापूर्वी बोरीवली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसटीएम) विकृताने महिला प्रवाशांना पाहून अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली होती. त्या पाठोपाठ पवई महाविद्यालयाच्या आवाराबाहेर दुचाकीस्वारांनी विद्यार्थिनींसमोर विकृत कृत्य केले होते.