शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १७ गुंडांवर मोक्का

By admin | Updated: July 15, 2016 03:18 IST

भिवंडी आणि कल्याण ग्रामीण भागात दहशत पसरवून टोळीचे प्रस्थ वाढणाऱ्या दोन गुंड टोळ्यांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियम

ठाणे : भिवंडी आणि कल्याण ग्रामीण भागात दहशत पसरवून टोळीचे प्रस्थ वाढणाऱ्या दोन गुंड टोळ्यांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत मोक्काची कारवाई केली आहे. यात टिटवाळ्यातील किरण डोंबाळे आणि भिवंडीमधील जगन पाटील या टोळीप्रमुखांसह १७ जणांचा समावेश आहे. यातील जगन पाटील हा भिवंडीतील सावंद-इताडे-मुठवळ गटग्रामपंचायतीचा माजी सरपंच असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी दिली.टिटवाळा परिसरातील इंदिरानगर येथील आशीर्वाद डेव्हलपर या कार्यालयात घुसून किरण डोंबाळे व त्याच्या साथीदारांनी डिसेंबर २०१५ मध्ये दिवंगत मनोज जयस्वाल यांच्याकडे ५ लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी तक्रार दिल्याचा राग मनात धरून डोंबाळे याने पुन्हा ८ एप्रिल २०१६ रोजी जयस्वाल यांच्या कार्यालयात साथीदारांसह घुसून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. किरण याच्याविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा हत्यार बाळगणे आदी गुन्ह्यांची कल्याण तालुका पोलिसांत नोंद आहे. त्याचबरोबर, त्याचे साथीदार टिटवाळा पूर्व येथील अमर थोरबोल याच्यावर दोन, तर मुरबाडमधील महेंद्र उर्फ काल्या मधुकर जाधव याच्यावर एक, तसेच मुरबाडमधील साईनाथ शेळके याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर, भिवंडी ग्रामीण पडघा परिसरातील माजी सरपंच जगन उर्फ जगदीश मधुकर पाटील याने आपल्या टोळीच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्याचे सत्र सुरू केले होते. दरम्यान, पाटील हा सावंद-इताडे-मुठवळचा सरपंच असताना त्याला आणि त्याच्या साथीदारांना विकासकांकडून आर्थिक लाभ मिळत होता, परंतु जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचा पराभव झाला. या वेळी पाटील आणि त्याच्या साथीदारांनी महिला सरपंचाचे पती संतोष भामरे यांना घातक हत्याराने मारहाण क रून दहशत पसरवली होती. माजी सरपंच पाटील याच्यावर पडघा, कल्याण तालुका आणि शहापूर या पोलीस ठाण्यांत खुनाचे प्रयत्न, गर्दी, मारामारी, दुखापत आदी ७ गुन्हे दाखल आहेत, तसेच त्याचा साथीदार यशवंत काशिनाथ पाटील याच्यावर दोन, गोरख राघो पाटील याच्यावर तीन, हरिश्चंद्र लहू वेळेकर याच्यावर दोन, रोशन रामा भोईर याच्यावर दोन, श्रीकांत काळुराम मगर याच्यावर तीन, सुधीर पाटील याच्यावर पाच, प्रदीप उर्फ पिंट्या पंढरीनाथ सुरेकरवर तीन, महेंद्र द्वारकानाथ पाटीलवर तीन, प्रदीप उर्फ बादी भगवान पाटील याच्यावर दोन, यतीन पाटील याच्यावर दोन आणि हर्षद उर्फ हर्षल गोराडकर याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)