शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मो.ह. शाळा वाचवण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 03:32 IST

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील मो.ह. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने अनोखे जनजागृती अभियान सुरू केले

ठाणे : मराठी शाळा सुरू राहावी आणि तेथील पटसंख्या वाढावी, यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील मो.ह. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने अनोखे जनजागृती अभियान सुरू केले आहे. यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांना वळवण्यासाठी जोगवा मागितला जात आहे. त्यात यश आल्याचे दिसत असून आतापर्यंत बालवर्गातील १५ जणांचा शाळा प्रवेश निश्चित झाला आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना टाकण्याचा सामान्यांपासून ते उच्चभ्रू अशा सर्वांचा क ल वाढला आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ही बाब लक्षात घेऊन ही शाळा वाचावी, यासाठी मो.ह. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक सरसावले आहेत. विशेष म्हणजे मिनी शिशू वर्गापासून ते इयत्ता चौथीपर्यंतच्या वर्गात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापासून विनाडोनेशन प्रवेश तसेच ८ एप्रिलपर्यंत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तूदेखील देण्यात येत आहे. त्यानुसार, आतापर्यंत तब्ब्ल १५ मुलांचे बालवर्गासाठी प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिली ते चौथी प्रवेशासाठी आतापर्यंत ३० अर्ज पालक घेऊन गेले आहेत. तसेच मो.ह. विद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी आरटीई नियमाप्रमाणे प्रवेश घ्यावा, असे आवाहनदेखील प्राथमिक विभागाने केले आहे. बाहरेच्या गावांतून येणाऱ्या मुलांसाठी बससेवा सुरू करावी, असे पत्र ठामपा परिवहन सभापतींना पत्र देणार असल्याचे आणि त्यांना विनंती करणार असल्याची माहिती मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)>बसचा प्रश्न महत्त्वाचामाणकोली, अंजूरदिवे परिसरांतील मुले शाळेत येण्यासाठी इच्छुक आहेत. पण त्यांना खासगी बसचा खर्च परवडणारा नाही.पालकवर्ग संभ्रमात पडल्याचे चित्र या वेळी शिक्षकांना निदर्शनास आले. तो प्रश्नही सोडवण्याचे प्रयत्न सुरू झाले.