शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा

By admin | Updated: November 24, 2014 03:03 IST

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून भाजपाने ‘यू टर्न’ घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता.

नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून भाजपाने ‘यू टर्न’ घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. पंतप्रधानांचा वेगळ््या विदर्भाला विरोध नाही. पक्षानेच यासंदर्भात ठराव मान्य केला असून, वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीला भाजपाचा पाठिंबा आहे. योग्य वेळी विदर्भ राज्याची निर्मिती होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.नागपुरात ‘वेद’तर्फे (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट) आयोजित ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेंट’ या चर्चासत्रादरम्यान नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी ही माहिती दिली.मोदी यांनी मुंबईसंदर्भात वक्तव्य करताना राज्य तुटू देणार नाही, असे म्हटले होते. वेगळ््या विदर्भाला पंतप्रधानांचा विरोध असल्याचा अपप्रचार होत आहे. मुळात त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता, असा खुलासा करतानाच वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीसाठी काँग्रेसनेही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आजपर्यंत विदर्भाचा विकास झाला नाही, त्यासाठी येथील नेतेच ७५ टक्के जबाबदार आहेत. नवीन राज्य निर्माण झाल्यावर विकास होईलच, यात पूर्ण तथ्य नाही. त्यासाठी योग्य नेतृत्व, नेतृत्वाला विकासदृष्टी आणि निर्णयक्षमता आवश्यक असते. भाजपाने वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीचा ठराव अगोदरच मंजूर केला आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत व त्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे ते म्हणाले. देशात ‘वन मॅन शो’ सुरू नसून लोकशाही पद्धतीनेच निर्णय घेतले जातात, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र वेगळ््या विदर्भाची निर्मिती करणे योग्य नसल्याचे मत मांडले. वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीमुळे विकास होईलच, असे नाही.विदर्भातील जनतेचा यामुळे फारसा फायदा होणार नाही, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मांडली. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी या चर्चासत्राचे संचालन केले. यावेळी त्यांच्या ‘२०१४ : इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तकाचे नितीन गडकरी व पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.