शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सचिवांसाठी राज्यातही आता ‘मोदी पॅटर्न’

By admin | Updated: July 13, 2016 04:05 IST

नव्या मंत्र्यांच्या कार्यालयात काम करण्याची इच्छा ठेवून अनेकांनी वशिल्यांचे खलिते पाठवणे सुरू केले असले, तरी या मंत्र्यांनी व्यक्तिगत स्टाफविषयी कमालीचे मौन बाळगले आहे.

अतुल कुलकर्णी,  मुंबईनव्या मंत्र्यांच्या कार्यालयात काम करण्याची इच्छा ठेवून अनेकांनी वशिल्यांचे खलिते पाठवणे सुरू केले असले, तरी या मंत्र्यांनी व्यक्तिगत स्टाफविषयी कमालीचे मौन बाळगले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तेच अधिकारी आपण घेऊ, असे नवे मंत्री सांगत आहेत.केंद्रातही नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर कोणत्याही मंत्र्यांना त्यांच्या पसंतीचे अधिकारी घेऊ दिले नव्हते. त्याचीच पुनरावृत्ती राज्यात फडणवीस यांनी केल्याचे बोलले जात आहे. नव्या मंत्र्यांकडे जे-जे अधिकारी आपले बायोडाटा घेऊन जात आहेत, त्यांना ‘मुख्यमंत्री आल्यानंतर पाहू’ असे एकच उत्तर ऐकायला मिळत आहे. एका जुन्या मंत्र्याने त्याच्या कडील स्वीय सचिवास तुमच्याकडे घ्या, असा निरोप नव्या मंत्र्यांना पाठवले. तो निरोप त्या मंत्र्याने जशास तसा मुख्यमंत्र्यांकडे रवाना केला. नवीन आलेली टीम पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणात असल्याचे हे निदर्शक आहे, असेही एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी मंत्री कार्यालयात दहा वर्षे काम केले आहे, त्यांना पुन्हा नव्याने मंत्री कार्यालयात घेऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी काढले होते. त्यातून अधिकाऱ्यांवर पक्षीय ठप्पे मारू नका, अशी मागणीही झाली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यास नकार दिला. तरीही तो आदेश डावलून ‘लोन बेसीस’ अशी नवी युक्ती अधिकाऱ्यांनी काढली. त्याचा आधार घेत, आजही काही मंत्र्यांकडे लोन बेसिसवर अधिकारी कार्यरत आहेतच. मुख्यमंत्री परत येईपर्यंत नवे मंत्री थांबणार की, त्यांना जे अधिकारी दिले जातील तेच घेणार? हा नजीकच्या काळात कळीचा प्रश्न बनणार आहे.