शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या धास्तीने मोदी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 04:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर नोटाबंदी लादली. त्यांच्या या निर्णयाचा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून पक्षाच्या होर्डिंगवरून

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर नोटाबंदी लादली. त्यांच्या या निर्णयाचा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून पक्षाच्या होर्डिंगवरून त्यांचे फोटो गायब करण्यात आले आहेत. लोक नोटाबंदीमुळे नाराज झाल्याचे भाजपाला आता कळले आहे. त्यामुळेच मुंबईतील ८० टक्के होर्डिंगवर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो छापले गेले आहेत, असा दावा काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्विजय सिंग सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. रंगशारदा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना, भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात सध्या पाच राज्यांत निवडणुका आहेत आणि सगळीकडे भाजपाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मुंबईतही लोकांना बदल हवा आहे. २० वर्षे एकत्र महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या तसेच राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या दोन्ही पक्षांमध्ये सध्या लुटीच्या हिश्शासाठी संघर्ष सुरूआहे. कोणाला किती हिस्सा मिळावा यासाठीच अत्यंत खालच्या पातळीवर हे दोघे भांडत आहेत. मुंबईकरांनी यापासून सावध झाले पाहिजे, असे दिग्विजय सिंग म्हणाले. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना ही खंडणीखोर आणि हफ्तावसुली पार्टी असल्याचा आरोप करीत आहेत. त्यामुळे केवळ आरोपबाजी न करता त्यांनी शिवसेनेवर एफआयआर दाखल करावा, असेही ते म्हणाले. काँग्रेसने मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाल्यास पारदर्शक कारभार कसा असतो हे आम्ही दाखवून देऊ, असेही दिग्विजय सिंग म्हणाले. तर, निवडणुकीपूर्वी एकमेकांशी भांडणारी शिवसेना, भाजपा निवडणुकीनंतर एकत्र येतील. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीच ही आमची ‘फ्रेंडली मॅच’ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्षांतील भांडण म्हणजे मुंबईकरांची फसवणूक असल्याचे निरूपम म्हणाले. (प्रतिनिधी)विश्वास कोण ठेवणारसध्या मुंबईत सर्वत्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत होर्डिंग्ज लावले असून, यात ‘मी शब्द देतो,’ असे म्हटले आहे. मुळात आता लोकांचा नरेंद्र मोदींच्या शब्दांवर विश्वास उडाला आहे; मग मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर कोण व कसा विश्वास ठेवेल, असा टोला मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना हाणला.