शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा मोदींचा निर्णय चुकीचा - स्वामी अग्निवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 15:50 IST

भारत-पाकिस्तान मधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'सार्क' परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय चुकीचा होता असे वक्तव्य स्वामी अग्निवेश यांनी केले.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ - रत-पाकिस्तान मधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'सार्क' परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय चुकीचा होता असे वक्तव्य स्वामी अग्निवेश यांनी केले. कितीही मोठे संकट असले तरी, त्यावर संवादाने मार्ग निघू शकतो, चर्चा हेच कोणत्याही वादावर प्रभावी माध्यम असू शकते, असे स्वामी अग्नीवेश यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच सर्जिकल स्ट्राईक ही देशासाठी नवीन गोष्ट नाही. या पुढे देखील संरक्षणासाठी याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे आत्ता त्याचा इतका गाजावाजा करणे गरजेचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
पत्रकार भवन येथे स्वामी अग्नीवेश यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकारसंघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे, सरचिटणीस अजय कांबळे, पुणे पत्रककार प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कुटे या वेळी उपस्थित होते. उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरुन विविध आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना स्वामी अग्नीवेश म्हणाले, देशातील विविध प्रश्नांवर संवाद करण्यासाठी संसद, आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चेसाठी संयुक्त राष्ट्रसंघ जसे महत्त्वाचे आहे, तसेच सार्क परिषद आशियाई देशांसाठी महत्त्वाची आहे. मात्र आपल्या पंतप्रधानांनी सार्क रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला. हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. संवादाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असतते. उलट आतंकवाद विरोधी लढ्यासाठी इस्लामाबाद येथे होत असलेल्या सार्क परिषदेचा उपयोग करता आला असता. त्यात आतंकवादा विरोधात लढा देण्यासाठी सार्क देशांचे संयुक्त सैन बनविण्याबातची भूमिका देखील मांडायला हवी होती.