शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा आघाडी सरकारवर हल्लाबोल, शिवसेनेचा उल्लेखही नाही

By admin | Updated: October 4, 2014 20:15 IST

आघाडी सरकारमुळे एक अख्खी पिढी बरबाद झाली अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली मात्र संपूर्ण भाषणात त्यांनी शिवसेनेचा उल्लेखही केला नाही.

 ऑनलाइन लोकमत

बीड, दि. ४ - आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारामुळे एक अख्खी पिढी बरबाद झाल्याची टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस-राष्ट्रावादी सरकारवर हल्ला चढवला मात्र संपूर्ण भाषणादरम्यान शिवसेनेचा त्यांनी उल्लेखही केला नाही. पंकजा व प्रीतम मुंडे यांच्यासाठी बीडमध्ये घेण्यात आलेल्या प्रचारसभेदरम्यान त्यांनी आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. मात्र शिवसेना वा युतीच्या तुटीवर त्यांनी संपूर्ण मौन बाळगले. 

गेली १५ वर्ष तुम्ही ज्या सरकारला निवडून दिले त्यांनी जनतेापेक्षा फक्त स्वत:ची चिंता केली असे सांगत  हे राष्ट्रवादी सरकार नसून भ्रष्टवादी सरकार असल्याची टीका त्यांनी केली. गुजरात हा महाराष्ट्राचा धाकटा भाऊ आहे, पण आज महाराष्ट्रापेक्षा गुजरातची स्थिती चांगली आहे. आघाडी सरकारमुळेच राज्याची वाट लागली आहे, असे ते म्हणाले. देशाचा विकास करायचा असेल तर प्रथम महाराष्ट्र वाचवावा लागेल असे त्यांनी सांगितले.  मला दिल्लीत बसून महाराष्ट्राची सेवा करायची आहे, महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे घेऊन जायचे आहे, मात्र त्यासाठी माझ्यात व तुमच्यामध्ये कोणताही अडथळा येऊन चालणार नाही, त्यामुळे या निवडणुकीत कमळावर शिक्का मारून  भाजपाला बहुमताने जिंकून द्या आणि राज्यात सुशासन आणा असे आवाहन त्यांनी केले. 

मुंडे असते तर...

गोपीनाथ मुंडे मला लहान भावासारखे होते, ते जर आज हयात असते तर मला महाराष्ट्रात यायची गरजच पडली नसती असे सांगत मुंडेचे स्वप्न प्रत्यक्षात आणूया असेही ते म्हणाले.