शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शहांच्या हाती मुंबईचे राजकारण!

By admin | Updated: November 22, 2015 02:55 IST

मुंबई व मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे महत्त्व आता कमी झाले असून, त्याबाबतचे सर्व राजकारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

- (डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी)

मुंबई व मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे महत्त्व आता कमी झाले असून, त्याबाबतचे सर्व राजकारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून केले जात आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर संभाजी भगत यांनी शनिवारी येथे केले.१६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात ‘मुंबईचे राजे.. मुंबईचे रंक’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या वेळी त्यांनी केंद्र सरकार शैक्षणिक व सांस्कृतिक धोरणामध्ये बदल घडवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) सांस्कृतिक दहशतवाद देशात पसरवित असल्याची टीका केली. साहित्य संमेलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या सत्रामध्ये भगत यांच्यासह कोमसापचे संमेलनाध्यक्ष जयंत पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, भारतकुमार राऊत, मुंबईचे अभ्यासक सुहास सोनावणे आणि अरुण पुराणिक या तज्ज्ञांनी बदलत्या मराठी महामुंबईबद्दल आपली भूमिका तपशीलवारपणे विशद केली. लोकशाहीर भगत म्हणाले की, मराठीचे राजकारण करणाऱ्यांनी पहिल्यांदा धारावीचे राजकारण, तेथील सामाजिक स्थितीचा अभ्यास केला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, मोदी आणि अमित शहा यांच्या हाती मराठीच्या राजकारणाचा कंट्रोल गेला आहे. त्यामुळे जातीयवादी लोक शहरांच्या विकासाला जातीय रंग देत आहेत. आरएसएस देशात सांस्कृतिक दहशतवाद पसरवित असून, केंद्र सरकार त्यांचा छुपा अंजेडा राबवित असल्याची टीका त्यांनी केली. प्रकाश अकोलकर म्हणाले, ‘एका सर्वेक्षणानुसार २०२५ सालापर्यंत मुंबापुरीची लोकसंख्या अडीच कोटींच्या घरात पोहोचणार आहे. त्यामुळे त्या वेळी उद्भविणाऱ्या समस्या विचारात घेऊन आतापासून उपाययोजना राबविण्याची गरज आहे.कोमसापचे संमेलनाध्यक्ष जयंत पवार म्हणाले, ‘ज्यांच्या हातात पैसा त्यांच्याच हाती मुंबईची सत्ता असे समीकरण बनले आहे. गेली कित्येक वर्षे बिल्डर, माफिया आणि सत्ताधारी यांच्याच हातात या महानगराची सूत्रे राहिलेली असून, ही शोषणाची साखळी दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे कष्टकरी समाज हद्दपार होत चालला आहे. (प्रतिनिधी)