शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी म्हणजे हिटलरच !

By admin | Updated: July 21, 2015 02:11 IST

सदैव या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर सध्या एका वेगळ्याच कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. महापौरांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच

मुंबई : सदैव या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर सध्या एका वेगळ्याच कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. महापौरांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच तोफ डागली आहे. त्यांनी मोदींची तुलना थेट हिलटरशी केली आहे.एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्नेहल आंंबेकर यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत ही काहीशी हिटलरसारखीच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मुळातच शिवसेना हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एक मोठा घटक पक्ष आहे. असे असूनही शिवसेनेचे भारतीय जनता पार्टीशी फारसे काही पटत नाही, अशी अवस्था आहे. त्यात आता महापौरांनी थेट मोदींच्या कार्यशैलीवर टीका करीत आणखी वाद ओढावून घेतला आहे. एक व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत मला आदर आहे. शिवाय स्वत:च्या क्षमतेवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. परंतु काही वेळेला मात्र त्यांचे वागणे मला हिटलरसारखे वाटते, असे म्हणत त्यांनी एका व्यक्तीच्या हातात सत्ता एकवटल्यानंतर असे होणारच, असे म्हणत वादाला आयते निमंत्रण दिले आहे. महापौरपदी विराजमान झालेल्या आंबेकर यांनी याआधीही अशीच उलटसुलट भाषणबाजी करून वाद ओढावून घेतले होते. मुलाखतीतील काही भागाचा विपर्यास करण्यात आल्याचे महापौर स्नेहल आंबेकर यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत आंबेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.