शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची धोरणे कामगारविरोधी : कांगो

By admin | Updated: January 13, 2015 00:05 IST

उद्योगधंद्यांच्या मालकांना स्वस्तात कामगार उपलब्ध करून देणे, कामगारांवर अतिरिक्त कामाचा बोजा लादणे, मानधन तत्त्वावर कामगारांची नेमणूक करण्याच्या दृष्टीने

सांगली : कामगार कायद्यांमध्ये बदल करून कामगारांना अडचणीत आणणाऱ्या आणि उद्योगपती आणि परदेशी गुंतवणुकीस प्रोत्साहन देणाऱ्या मोदी सरकारची धोरणे कामगारविरोधी असल्याचा आरोप आयटक कामगार संघटनेचे नेते भालचंद्र कांगो यांनी सोमवारी येथे पत्रकार बैठकीत केला. कांगो म्हणाले की, मोदी सरकारने देशातील प्रमुख कामगार संघटनांची कसलीही चर्चा न करताच कामगार कायद्यांमध्ये भांडवलशाहीला अनुकूल असे बदल केले आहेत. उद्योगधंद्यांच्या मालकांना स्वस्तात कामगार उपलब्ध करून देणे, कामगारांवर अतिरिक्त कामाचा बोजा लादणे, मानधन तत्त्वावर कामगारांची नेमणूक करण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडताना दिसत आहेत. यामुळे देशातील बहुतांशी कामगारांचे भवितव्य अधांतरी होणार आहे. केंद्र सरकारने ‘फॅक्टरीज अ‍ॅक्ट’मध्ये बदल करण्याचे सुतोवाच केले आहे. यामुळे ४० कामगारांपर्यंत संख्या असलेल्या कारखान्यातील कामगारांना भविष्यनिर्वाह निधी, बोनस, इएसआय आदी लाभ मिळणे दुरापास्त होणार आहे. पूर्वी तिसऱ्या पाळीत कामावर ठेवण्यास निर्बंध होते. हे निर्बंध आता स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली काढून टाकण्यात येत आहेत. मोदी सरकार घेत असलेले निर्णय पाहता केवळ नफा कमावणे एवढाच उद्देश त्यांच्यापुढे दिसतो. असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना लागू करणे आवश्यक आहे. सर्वच क्षेत्रातील कामगार आज सरकारविरोधी संघर्षाच्या तयारीत आहेत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष रमेश सहस्त्रबुध्दे, शंकर पुजारी, ‘आयटक’चे बी. सी. शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)