शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेल अर्शी खानला पुण्यात हॉटेलमध्ये अटक, देहविक्रयचा आरोप

By admin | Updated: October 25, 2016 17:00 IST

मुंबईच्या चित्रपट व जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेली वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खानला पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करताना

ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. २५ - मुंबईच्या चित्रपट व जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेली वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खानला पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अटक करण्यात आली. तिच्यावर देहविक्रीयचा आरोप आहे. मंगळवारी पहाटे हॉटेल अरोरा टॉवरमध्ये ही कारवाई करण्यात आली. 
 
तिच्यासह आढळून आलेल्या एजंटला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वानवडीमधील रेस्क्यू होममधील महिला व कर्मचा-यांना मारहाण करुन ही मॉडेल पसार झाली आहे. विशेष म्हणजे ती स्वतःला पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीची प्रेयसी म्हणवते.
 
विपुल पवनबहाद्दर दलाल (रा. आसाम)  असे अटक एजंटचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना ही मॉडेल दोन दिवसांपासून पुण्यात असून विपुलच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सहायक पोलिस आयुक्त सुरेश भोसले, वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांच्या सुचनांनुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी हॉटेलवर मध्यरात्री रात्री एकच्या दरम्यान छापा टाकून मॉडेल व एजंटला ताब्यात घेतले. 
 
मॉडेलची रवानगी मोहम्मदवाडी येथील रेस्क्यू होममध्ये करण्यात आली. परंतु तेथील महिला व कर्मचा-यांना मारहाण करून ही मॉडेल पसार झाली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा पुण्यातील हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय समोर आला आहे.
 
संबंधित मॉडेल मुळ भोपाळ येथील राहणारी असून गेल्या काही वर्षांपासून मीरा भाईंदर मध्ये राहात आहे. ती मॉडेलिंग, जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रात काम करते. पाकिस्तानच्या एका क्रिकेटर सोबत तिचे प्रेमसंबंध होते.