शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या मानधनासाठी एड्सग्रस्तांची थट्टा!

By admin | Updated: December 8, 2014 02:16 IST

नियती कितीही निष्ठूर झाली, तरी जगण्याची जिद्द माणसाला त्यावर मात करण्यास शिकवतेच.

सतीश डोंगरे, नाशिकनियती कितीही निष्ठूर झाली, तरी जगण्याची जिद्द माणसाला त्यावर मात करण्यास शिकवतेच. एड्ससारख्या असाध्य आजाराने ग्रासलेले रुग्ण या निराशेतून बाहेर येऊन समाजाच्या उपेक्षेची पर्वा न करता आपले जीवन जगत आहेत; मात्र समाजाप्रमाणेच शासनही एड्सबाधितांची थट्टाच करीत असून, केवळ ४०० रुपये मानधनासाठी त्यांना डझनभर कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे. एचआयव्हीबाधित रुग्णांना संजय गांधी योजना, बाल संगोपन योजना, श्रावणबाळ योजना, पोषक आहार योजना, अंत्योदय योजना आदिंच्या माध्यमातून सरकारी मदत म्हणून दरमहा ४०० रुपये मानधन दिले जाते; मात्र या मानधनासाठी एचआयव्हीबाधितांना एक नव्हे तर डझनभर नियमांची पूर्तता करावी लागत असल्याने ‘रोग परवडला, पण मदत नको’ अशी भावना या रुग्णांमध्ये बळावत आहे. कारण वरील कुठल्याही योजनेचा लाभ घेताना संबंधित रुग्ण केवळ एचआयव्हीबाधित असणे पुरेसे नसून, तो दारिद्र्यरेषेखालील असणे गरजेचे असल्याची अट घालण्यात आलेली आहे. ...अन् चिमुकल्याचा गेला बळीजुने नाशिक येथील एचआयव्हीबाधित असलेल्या दहा वर्षीय रितेशने (नाव बदलले आहे) शासनाकडून बाल संगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी यासाठी यश फाउंडेशनच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. हलाखीचे जीवन जगत असलेल्या रितेशला वेळेवर योग्य पोषक आहार मिळत नसल्याने त्याला सरकारी मदतीची अत्यंत गरज होती; परंतु प्रस्ताव मान्य करण्यासाठी डझनभर कागदपत्रांची मागणी केल्याने ती जुळविण्यासाठी रितेशची धडपड अपुरी पडली. त्यातच रितेशची ही झुंज अर्ध्यातच संपुष्टात आली.