शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या ब्लू प्रिंटला अखेर मुहूर्त

By admin | Updated: September 3, 2014 02:56 IST

तब्बल सात वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विकासाची ब्लू प्रिंट गणोशोत्सवानंतर 10 सप्टेंबर रोजी किंवा त्याच्या आसपास माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सादर केली जाणार आहे

संदीप प्रधान -  मुंबई 
तब्बल सात वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विकासाची ब्लू प्रिंट गणोशोत्सवानंतर 10 सप्टेंबर रोजी किंवा त्याच्या आसपास माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सादर केली जाणार आहे. या ब्लू प्रिंटचे किमान अडीच तासांचे सादरीकरण केले जाणार असून विविध विकास योजनांकरिता निधी उभारणीचे मार्ग त्यामध्ये सुचवण्यात आले आहेत.
नैसर्गिक साधनस्रोत, सेवा यावर कर अथवा दर आकारणी करण्याची, काही सेवांच्या वापराचे अधिकार देऊन ब्ल्यू प्रिंटच्या अंमलबजावणीकरिता लागणारा मोठा निधी उभारण्याचे पीपीपी मॉडेल राबवण्याची शिफारस त्यात केली आहे.
ही ब्लू प्रिंट 1क् सप्टेंबर रोजी सादर केली गेली तर 9 तारखेला त्याची षण्मुखानंद सभागृहात रंगीत तालीम होणार आहे. मनसेच्या 4क् तज्ज्ञांच्या कोअर ग्रुपने गेली सात वर्षे अनेक बाबींचा तपशीलात जाऊन 
अभ्यास करून तयार केलेली ही ब्लू प्रिंट सादर होतानाच त्याची वेबसाईट, अॅप लाँच केले जाणार आहे. याकरिता टीसीएस, रिलायन्स अशा बडय़ा कंपन्या, मुंबई-पुण्यातील काही प्रख्यात बांधकाम व्यावसायिक, वेगवेगळ्य़ा क्षेत्रतील तज्ज्ञ यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव केलेला आहे.
अनेक विकास योजना सुचवताना कोणत्या साधनसुविधा लागतील, त्याची उपलब्धता कशी करता येईल, त्याकरिता कोणत्या कायद्यांत सुधारणा कराव्या लागतील, योजनेकरिता किती खर्च अपेक्षित असेल, त्याकरिता पैसा कुठून उभा केला जाऊ शकेल या सर्व बाबींचा ऊहापोह ब्लू प्रिंटमध्ये केलेला आहे.
काही छोटय़ा देशांनी अशा पद्धतीची अभिनव पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) मॉडेल राबवली असून त्याचे दाखले या सादरीकरणात देण्यात येणार आहेत. सरकारच्या सध्याच्या काही योजनांचा आढावा घेताना त्यामधील चांगल्या गोष्टी तशाच्या तशा अंमलात आणण्याची शिफारस केली असून काही त्रुटी दूर करण्याचे उपाय देखील सूचवले आहेत. 
 
कर-दर आकारणी
केवळ भूखंड विक्री करून किंवा समुद्रात भराव घालून ब्लू प्रिंटची अंमलबजावणी करण्याची वादग्रस्त ठरणारी कल्पना यामध्ये मांडलेली नाही. अनेक नैसर्गिक साधनस्रोतांकरिता सध्या कर अथवा दर आकारले जात नाहीत. त्यामुळे त्याची किंमत लोकांना कळत नाही. त्यावर कर-दर आकारणी केली तर ब्लू प्रिंटच्या अंमलबजावणीसाठी निधी उभा राहू शकतो, असे दाखवले आहे.