शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मनसे स्वबळावरच लढणार

By admin | Updated: January 12, 2017 04:40 IST

प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करू, असे काल सांगणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज

मुंबई : प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करू, असे काल सांगणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लगेच महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याचे सांगितले. युतीसाठी मी कुणाकडे गेलेलो नाही आणि कुणी माझ्याकडे आले नाही. त्यामुळे या सर्व चर्चेला सध्या तरी काही अर्थ नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या वॉररूमचे बुधवारी राज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी फेसबुक लाइव्ह चॅटद्वारे राज यांनी लोकांशी संवाद साधला. युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करू, या राज यांच्या मंगळवारच्या विधानाबाबत विचारले असता, युती करणार असल्याची निव्वळ अफवा असून, तसे वक्तव्य आपण केले नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले. मुंबईतील सर्व २२७ जागा मनसे लढविणार आहे, असे सांगतानाच, त्यांनी शिवसेना-भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा आणि शिवसेनेकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही. आता त्यांच्याकडे फक्त पैसा असून, त्याच्या जोरावर अन्य पक्षातील लोकांना फोडत आहेत, असे राज म्हणाले. महापालिकेतील भ्रष्टाचारासाठी शिवसेनेसोबत भाजपाही तितकीच जबाबदार आहे. दोघांनी मिळूनच ‘फावडा मारला ना’ असा टोमणाही त्यांनी हाणला. मनसेला लागलेल्या गळतीबद्दल विचारले असता, ज्यांना पक्षातून बाहेर पडायचे आहे त्यांनी जावे, पक्षात अनेक जवळचे लोक आहेत. मी ट्रेलर दाखवत नाही, थेट पिक्चरच दाखवतो, त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी पुढे काय करेन, हे आत्ताच सांगू शकत नाही, असेही राज म्हणाले. लाइव्ह चॅटमध्ये राज ठाकरे यांनी नाशिकच्या विकासाचा मुद्दा मांडला. मनसेने नाशिकमध्ये चांगले काम केले आहे. सत्तेवर आल्यापासून नाशिक महापालिकेचे कर्ज फेडून आम्ही काम केले. जे विकले गेले, त्यावर मी बोलणार नाही, पण आता महापालिकेत पुन्हा मनसेचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)‘लोकमत’ने केले निष्पक्ष वार्तांकन ‘लोकमत’ एक निष्पक्ष वर्तमानपत्र असून, नोटाबंदीसारख्या महत्त्वाच्या विषयांवर वार्तांकन करताना, ‘लोकमत’ने दोन्ही बाजू मांडल्या. कुणा एकाची तळी उचलली नाही, अशा शब्दांत राज यांनी ‘लोकमत’च्या निष्पक्ष वार्तांकनाचे कौतुक केले. वर्तमानपत्रे, चॅनल्स विकले गेल्यासारखे बातम्या देत आहेत. या सर्व परिस्थितीत ‘लोकमत’सारखे वर्तमानपत्र निष्पक्षपणे वार्तांकन करत आहे, अशा शब्दांत राज यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले.