शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मनसे उपाध्यक्ष सेनेत जाणार?

By admin | Updated: March 16, 2017 02:51 IST

मीरा-भार्इंदर पालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासूनच काहींनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, तर काही जण अन्य पक्षांत जाण्याच्या तयारीत आहेत

राजू काळे , भार्इंदरमीरा-भार्इंदर पालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासूनच काहींनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, तर काही जण अन्य पक्षांत जाण्याच्या तयारीत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मर्जीतील असलेले उपाध्यक्ष अरुण कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या पतपेढी निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. त्याचबरोबर अंतर्गत कुरघोडीमुळे ते जेरीस आले आहेत.१९९२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. कदम यांचे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वासोबत बिनसल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्या वेळी त्यांनी मनसेत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाने त्यांच्यावर मीरा-भार्इंदरची धुरा सोपवली. पक्षाच्या शहराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आंदोलनांच्या माध्यमातून विकासाविरोधातील धोरणांविरोधात आंदोलने केली. २००७ मधील पालिका निवडणुकीत त्यांनी पक्षाचे चार नगरसेवक निवडून आणले. २००९ मध्ये झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या विजयाला अप्रत्यक्ष हातभार लावला. त्यांनी आपले निकटवर्तीय व माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांना आमदारकीच्या निवडणुकीत भाजपाचे नरेंद्र मेहता यांच्याविरोधात उतरवले. यात मेहता पराभूत झाले. २०१२ मध्ये त्यांनी पाणीसमस्येबाबत पालिकेवर मोर्चा काढला होता. काही काळ राजकारणातून बाजूला झालेले कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी मेहेरनजर दाखवून त्यांच्यावर उपाध्यक्षपदासह भार्इंदर शहर (जिल्हा) व पालघर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. २०१६ मध्ये झालेल्या पालिका कर्मचारी पतपेढीतील पक्षाचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला.