शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाविरोधात मनपाची धडक मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 03:03 IST

पावसाळा संपल्यामुळे महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम पुन्हा सुरू झाली

नवी मुंबई : पावसाळा संपल्यामुळे महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. बेलापूर, तुर्भे, ऐरोलीसह कोपरखैरणे परिसरात एकाच वेळी धडक मोहिमा सुरू झाल्या असून अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फेरीवाले, मार्जिनल स्पेस व इतर अतिक्रमण विरोधात जोरदार मोहीम राबविली होती. पावसाळ्यामुळे अतिक्रमण विरोधी मोहीम थांबविली होती. पावसाळा संपताच कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उपआयुक्त कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सत्रांमध्ये कारवाई सुरू केली आहे. >दोन डंपर जप्तडेब्रिजविरोधी पथकानेही शहरात कारवाई सुरू केली आहे. गोठविली व घणसोलीमध्ये पामबीच मार्गाजवळ मँग्रोजवर डेब्रिज टाकणाऱ्या दोन डंपरवर कारवाई केली आहे. शहरवासीयांना अतिक्रमणमुक्त पदपथ उपलब्ध व्हावे यासाठी नियमितपणे कारवाई केली जाणार आहे. >बेलापूरमध्ये फेरीवाल्यांना हटविलेबेलापूरचे विभाग अधिकारी सुभाष अडागळे यांनी सेक्टर ४ व २३ मध्ये कारवाई करून १५३ फेरीवाल्यांना हटविले आहे. फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले आहे. सुनील गावस्कर मैदानासमोर उभारण्यात येणाऱ्या दोन मोबाइल टॉवरवरही कारवाई केली. दोन मजली इमारतीवर कारवाईऐरोलीमध्ये गीता मिश्रा यांनी दोन मजली अनधिकृत इमारत उभारली होती. सहायक आयुक्त चंद्रकांत तायडे यांच्या पथकाने या इमारतीवर कारवाई केली आहे. सेक्टर १५ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन नजीकच्या अनधिकृत नर्सरीवरही कारवाई केली आहे, याशिवाय सेक्टर १ मधील अनधिकृत मोबाइल टॉवर हटविण्यात आला. ६३ झोपड्यांवर कारवाईतुर्भे विभाग अधिकारी अंगाई साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मलनि:सारण केंद्राबाहेरील झोपड्यावर असलेल्या ६३ झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. याशिवाय सेक्टर १९ मधील व्यापाऱ्यांनी मार्जिनल स्पेसमध्ये केलेले अतिक्रमणही काढण्यात आले आहे.