शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विसरभोळ्यांचा रेल्वे पोलिसांना मनस्ताप

By admin | Updated: September 5, 2016 02:12 IST

उपनगरीय लोकल मार्गावरून प्रवास करताना प्रवासांत अनेकदा प्रवासी आपल्या बॅगा विसरतात आणि बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्यांची तारांबळ उडते.

मुंबई : उपनगरीय लोकल मार्गावरून प्रवास करताना प्रवासांत अनेकदा प्रवासी आपल्या बॅगा विसरतात आणि बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्यांची तारांबळ उडते. बॅगा शोधण्यासाठी प्रवाशांकडून अखेर लोहमार्ग पोलिसांची मदत घेण्यात येते. आॅगस्ट महिन्यात अशा विसरभोळ्या प्रवाशांकडून तब्बल १५ लाख किमतीच्या वस्तू गहाळ झाल्या होत्या. त्याचा शोध घेत त्या प्रवाशांना परत करण्यात आल्या आहेत. यात लॅपटॉप आणि सोन्याचा मुद्देमाल अधिक असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरच्या उपनगरीय लोकलचा पसारा सीएसटी ते कर्जत, कसारा, खोपोली आणि वाशी, पनवेलपर्यंत, तर पश्चिम रेल्वे चर्चगेट ते डहाणूपर्यंत पसरलेली आहे. या सर्व मार्गांवरून जवळपास ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवास करताना अनेक प्रवाशांच्या वस्तूंवर चोरांकडून डल्लाच मारला जातो. हा डल्ला मारला जात असतानाच, खुद्द प्रवाशांकडूनच प्रवासात स्वत:च्या बॅगा किंवा मौल्यवान वस्तू विसरल्या जातात. ही बाब लक्षात येताच ९८३३३३११११ या हेल्पलाइनवर संपर्क साधून लोहमार्ग पोलिसांची मदत घेतली जाते. आॅगस्ट महिन्यात बॅगा व मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याचे १ हजार २१ कॉल लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाइनवर आले आहेत. यात २०८ बॅगा व मौल्यवान वस्तू शोधून देण्यात यश आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यामध्ये ३ लाख ५६ हजार रुपये किमतीचे १२३ ग्रॅम सोने, ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे १२ लॅपटॉप, २ लाख ८९ हजार १५० रुपये किमतीचे ३४ मोबाइल, २ लाख ३२ हजार ५८० रुपये रोख रक्कम आणि २ लाख ७४ हजार ९४० रुपये व अन्य वस्तूंसह जवळपास १५ लाखांचा मुद्देमाल प्रवाशांना परत केला आहे. >वैद्यकीय मदतीसाठी ८५ कॉलअपघात, अपमृत्यू आणि वैद्यकीय मदतीसाठी लोहमार्ग पोलिसांना ८५ कॉल आले. त्यापैकी वैद्यकीय मदतीसाठी २५ तर जखमींच्या मदतीसाठी ४८ कॉलचा समावेश आहे. उर्वरित १२ कॉल हे मृत्यू झाल्याची माहितीचे होते.हेल्पलाइनवर तक्रारीहीप्रवाशांकडून हेल्पलाइनवर तक्रारीही करत मदत मागण्यात आली आहे. विकलांग डब्यात अन्य प्रवाशांनी प्रवेश केल्याचे २८, महिला डब्यातून ७६, फेरीवाल्यांबाबतचे ९ त्याचप्रमाणे बेवारस बॅग आणि संशयित बॅगांबाबत ६० व संशयित व्यक्तींबाबत २५ कॉल आल्याची माहिती देण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या सोईसुविधांबाबतीतीलही १४ कॉल आले.