शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करून अल्पवयीन मुलीचा खून

By admin | Updated: November 15, 2015 00:47 IST

राजेवाडी (ता. पुरंदर) येथे एका १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा काठी व वस्ताऱ्याने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे.

जेजुरी : राजेवाडी (ता. पुरंदर) येथे एका १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा काठी व वस्ताऱ्याने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी काही तासांतच आरोपीस अटक केली असून त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर केले असता २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुदाम सूर्यवंशी (वय ५०, मूळ रा. खळोसा, ता. औसा, जि. लातूर, हल्ली रा. राजेवाडी, (पाटीलवस्ती), ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ शुक्रवारी (दि. १३) या घटनेत बळी पडलेली ही तरुणी मौजे राजेवाडी गावचे राजेवाडी रेल्वेस्थानकानजीकच्या पाटीलवाडी येथील त्यांच्याच शेतात आईबरोबर आली होती. आई शेतातील काम करीत होती. ही तरुणी अभ्यास करीत बसली होती. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आईने जेवण करायला जाऊ, असे सांगितले असता तिने मला भूक नाही, तू जेवण कर असे सांगितले. आई जेवण करून दुसऱ्या शेतात काम करायला गेली होती. सायंकाळी ५ वाजता बाजूच्या शेतातून आई ती बसली होती तेथे आली़ पण ती दिसली नाही. तिला सर्वत्र शोधले, मात्र ती न आढळल्याने कुटुंबीयांना तिचा शोध घेण्यास बोलावले. सर्वत्र शोध घेतला असता सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शेताच्या बांधाखालील बाजूच्या तालीखाली तिचे कपडे आढळून आले. जवळच बाभळीच्या लाकडात तिचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. या तरुणीच्या आईने पोलीसपाटलाच्या मदतीने जेजुरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. फिर्यादीत त्यांनी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुलीला बोलावण्यासाठी जाताना शेजारील शेतकरी धनंजय मारुती जगताप यांच्या शेतावर मजुरीचे काम करणारा सुदाम सूर्यवंशी मला पाहून पळून गेला होता, असा संशय व्यक्त केला होता. (वार्ताहर)पोलीस शिपाई गणेश थापळे, श्वान दुर्गासह घटनास्थळी हजर झाले. श्वानाने मृत मुलीच्या देहापासून माग काढीत आरोपी सुदाम सूर्यवंशी याचे जवळच असलेले घर गाठून घरातील रक्ताने माखलेले कपडे काढून दिल्याने पोलिसांचे काम सोपे झाले. सुदाम सूर्यवंशी यास रात्री उशिरा अटक केली. जेजुरी पोलिसांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन पंचांसमक्ष पाहणी केली, ठसेतज्ज्ञ सहायक पोलीस निरीक्षक परवीन शेख, वैज्ञानिक सहायक आर. एस. लोखंडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्याने वस्ताऱ्याचा धाक दाखवत व अनेक वार करीत तरुणीवर बलात्कार केला, तसेच कळकाच्या काठीने मारून निर्घृणपणे खून करून मृतदेह तालीखाली फरफटत ओढत नेऊन टाकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. काल घडलेल्या या अत्यंत विकृत व हृदयद्रावक घटनेचे पडसाद संपूर्ण राजेवाडी गावावर उमटले असून आज दिवसभरही संपूर्ण गावात तणावपूर्ण शांतता पसरलेली होती. संतप्त ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेवले होते.