शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सहा महिन्यांनी घटना उघड

By admin | Updated: July 29, 2016 15:53 IST

जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजीपंत) येथे एका १६ वर्षीय तरुणीवर हातपाय बांधून तिच्यावर बळजबरी केल्याचा प्रकार सात महिन्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीवरून उघड झाला आहे.

तळेगाव येथील प्रकरण: पीडिता सात महिन्याची गर्भवतीवर्धा - जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजीपंत) येथे एका १६ वर्षीय तरुणीवर हातपाय बांधून तिच्यावर बळजबरी केल्याचा प्रकार सात महिन्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीवरून उघड झाला आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी केली असून प्रकरणाची माहिती तळेगाव (श्यामजीपंत) पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती घेण्याकरिता तळेगाव पोलीस सेवाग्राम पोलिसातून कागदपत्र घेत या प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 

पोलीस सुत्रांनीदिलेल्या माहितीनुसार, तळेगाव (श्यामजीपंत) पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पारडी शिवारात एक १६ वर्षीय मुलगी शेतात एकटी असल्याचे पाहून अज्ञात इसमाने तिच्यावर बलात्कार केला. हे कृत्य करण्यापूर्वी आरोपीने मुलीच्या नाकाला रूमाल लावून तिला बेशुद्ध केले. जेव्हा पीडिता शुद्धीवर आली होती. तोपर्यंत सदर इसम तिथून पसार झाला होता. तिने ही बाब कुटुंबियांना सांगितली. मात्र त्यावेळी पोलिसात तक्रार देण्यात आली नसल्याचे तिच्या कुटुंबियांकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे. ही घटना सुमारे सात महिन्यापूर्वी घडली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. 

सदर पीडितेला आई वडील नसल्याने ती तिच्या बहिणीकडे राहते. दरम्यान यानंतर २२ जुलैला सदर मुलीला चक्कर आल्याने ती पडली. त्यामुळे तीला उपचारार्थ सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी ती गर्भवती असल्याची बाब पुढे आली. याची प्राथमिक तक्रार सेवाग्राम पोलीसात देण्यात आली. या तक्रारीचे कागदपत्र तळेगाव पोलिसांना शुक्रवारी प्राप्त झाल्यानंतर अज्ञात इसमावर कलम ३७६, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण कायद्यान्वये कलम ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास तळेगाव पोलीस करीत आहे.

सदर प्रकरणाची माहिती सहा महिन्यांनी मिळाल्याने याबाबत आता तक्रार नोंदविली आहे. पीडिता अल्पवयीन असल्याने बाल सरंक्षण समितीत याबाबत बयान नोंदवेल, घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात येईल.- राजेंद्र कापसे, पोलीस उपनिरीक्षक, तळेगाव