शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

By admin | Updated: October 14, 2016 03:06 IST

तालुक्यातील पोयनाड परिसरातील श्रीगाण आदिवासी वाडीतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना

अलिबाग : तालुक्यातील पोयनाड परिसरातील श्रीगाण आदिवासी वाडीतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. रायगडच्या पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपीला गजाआड केले.पोयनाड येथील श्रीगाण आदिवासीवाडीवर ही अल्पवयीन मुलगी राहत होती. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गावातील लहान मुलाच्या पाचवीचा कार्यक्रम आटोपून ती घरी जात असताना आरोपीने त्या मुलीला वाटेत गाठले. अंधाराचा फायदा घेत, त्याने त्या मुलीला रस्त्याशेजारी असणाऱ्या मोकळ््या मैदानात नेले व तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी प्रतिकार करीत असल्याने, त्याने तिला टोकदार दगडाने मारले. त्यामध्ये ती गंभीर जखमी होऊन मरण पावली. आरोपीने तेथून पळ काढला. या घटनेची फिर्याद दाखल होताच, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. ही मुलगी ज्या आदिवासी वाडीवर राहात होती, त्याच आदिवासी वाडीवर आरोपी राहात होता. पोलिसांनी मिळविलेल्या माहितीच्या आधारे आरोपीला गुरुवारी संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या दरम्यान, म्हणजेच चोवीस तासांच्या आत अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)