शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

...तर मंत्र्यांना बायकाच बडवतील!

By admin | Updated: July 29, 2016 01:22 IST

सत्ता येऊन पावणेदोन वर्षे झाली तरी महागाई कमी झाली का, एवढं फक्त आपल्या बायकांना विचारा. तुम्हाला तुमच्या बायकाच लाटणं घेऊन बडवतात की नाही बघा, अशा शब्दात

मुंबई : सत्ता येऊन पावणेदोन वर्षे झाली तरी महागाई कमी झाली का, एवढं फक्त आपल्या बायकांना विचारा. तुम्हाला तुमच्या बायकाच लाटणं घेऊन बडवतात की नाही बघा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत भाजपा-शिवसेनेच्या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. महागाई, बेरोजगारी तसेच कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांच्या वतीने चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेला सुरुवात करताना पवारांनी हा हल्लाबोल केला. निवडणुकीच्या काळात कोणकोणती आश्वासने तुम्ही दिली होती हे आठवा. सह्याद्रीवर बसून त्यांचा आढावा घ्या. पाळलेली आश्वासने दिसत नाहीत हे पाहून तुमची झोप उडेल त्या दिवशी राज्याच्या हिताचे निर्णय होऊ लागतील, असे पवार यांनी बजावले. अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारला, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा?’ असा सवाल करावासा वाटतो. नुसती जाहिरातबाजी सुरु आहे. मोठमोठे दावे केले जात आहेत. जाहिरातबाजीबाबत तर भाजपाचा हात कोणी पकडू शकत नाही, असे ते म्हणाले. सभागृहात २८८ सदस्य आहेत. त्यांच्यापैकी किती जणांच्या मतदारसंघात किती कोटींची गुंतवणूक मेक इन महाराष्ट्रमध्ये आली? आहेत ते उद्योग बंद पडत आहेत. बेकारी कधी नव्हे एवढी वाढली आहे. बेकारीपायी तरुण दहशतवादाकडे वळत आहे, असे ते म्हणाले. गोवंश हत्या बंदीचा निर्णय घेऊन सरकारने अनेकांना बेरोजगार केल्याची टीकाही त्यांनी केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे यावेळी काढले. (विशेष प्रतिनिधी)