शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपद सोडण्याची ज्येष्ठ मंत्र्यांची तयारी!

By admin | Updated: April 6, 2017 05:19 IST

मंत्रीपद सोडून पक्षसंघटनेत पूर्णवेळ काम करण्याची आपली तयारी असल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले

यदु जोशी,मुंबई- शिवसेनेत मंत्रिपदाची खांदेपालट होईल, अशी चर्चा असतानाच मंत्रिपद सोडून पक्षसंघटनेत पूर्णवेळ काम करण्याची आपली तयारी असल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले असल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी आज दिली. अन्य काही मंत्रीही तोच कित्ता गिरवून ठाकरे यांना सर्वाधिकार देतील, अशी शक्यता आहे. दीर्घकाळ पक्षसंघटनेत काम केलेल्या या मंत्र्यांबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुठली भूमिका घेतात या बाबत उत्सुकता आहे. शिवसेनेचे मंत्री, आमदारांची बैठक ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी मातोश्रीवर बोलविली आहे. पक्षसंघटना तसेच मंत्रिमंडळातही काही बदल होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मंत्रीपदावर पाणी सोडण्याची तयारी एका ज्येष्ठ मंत्र्याने दाखविली असताना अन्य ज्येष्ठ मंत्री उद्याच्या बैठकीत तशीच आॅफर देऊन उद्धव यांना मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये खांदेपालट करण्याचे अधिकार देण्याची भूमिका घेतील, अशी शक्यता आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द आमच्या पक्षात अंतिम आहे. त्यामुळे मंत्र्यांमध्ये कोणाला वगळायचे, कोणत्या राज्यमंत्र्यास कॅबिनेटची संधी द्यायची किंवा कोणत्या आमदारास मंत्रीपद द्यायचे हे ठरविता यावे म्हणून केवळ कॅबिनेटच नव्हे तर सर्व राज्यमंत्र्यांनीही त्यांच्याकडे देणे उचित ठरेल, अशी भावना शिवसेनेच्या एका आमदाराने व्यक्त केली. सुत्रांनुसार, सेनेच्या मंत्र्यांमध्ये फारतर एखाददोन मंत्र्यांना वगळले जाऊ शकते. अनेक वर्षे पक्षाची सेवा केलेल्या मंत्र्यांना काही आमदारांनी तक्रार केली म्हणून घरचा रस्ता दाखविणे हे त्यांच्या निष्ठेवर अन्याय केल्यासारखे होईल, असाही विचार मातोश्रीवर प्रबळ आहे. सेनेचे पाचही कॅबिनेट मंत्री हे मुंबई-ठाण्याचे आहेत. त्यातील एखादे कॅबिनेट मंत्रीपद मराठवाड्याकडे जाऊ शकते. तसे झाले तर अर्जून खोतकर यांना संधी असेल. जळगावमध्ये राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना बळ देण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली तर कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पाटील यांच्या गळ्यात पडू शकते. >यांची चर्चाउद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्यापैकी एक किंवा दोन जणांना पक्षसंघटनेत पाठविले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. हे चौघेही विधान परिषदेचे सदस्य आहेत. देसाई आणि सावंत यांचे मातोश्रीशी अतिशय चांगले संबंध आहेत. रामदास कदम यांची मंत्री म्हणून ही शेवटची इनिंग असेल आणि ते त्या नंतर पक्षसंघटनेच्या कामाला वाहून घेतील, असे सांगत त्यांचा बचाव केला जाऊ शकतो.