अतुल कुलकर्णी, मुंबईविदर्भ, मराठवाड्यासह राज्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि समन्यायी विकास करण्यासाठी केळकर समितीच्या अहवालावरील शिफारशीवर विधानसभेत दोन दिवसांची चर्चा ठेवली गेली; मात्र दुसऱ्या दिवशीच्या चर्चेला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार वगळता मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले.आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा काही वेळ सभागृहात बसले तर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे दोन मिनिटांसाठी सभागृहात येऊन गेले. हे तीन मंत्री वगळता उर्वरित मंत्री या चर्चेकडे फिरकलेच नाहीत. याउलट विरोधी बाकावरचे चित्र होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, गोपाळ अग्रवाल असे अनेक सदस्य शेवटपर्यंत सभागृहात बसून होते.
मंत्र्यांची बाके ओस!
By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST