शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री लोणीकर यांच्या मेव्हण्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या

By admin | Updated: December 6, 2015 02:04 IST

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मेव्हणे कैलास बालासाहेब खिस्ते (४५) यांनी नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून निवळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.

बोरी (जि. परभणी) : पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मेव्हणे कैलास बालासाहेब खिस्ते (४५) यांनी नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून निवळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली़जिंतूर तालुक्यातील निवळी येथील कैलास खिस्ते यांच्याकडे शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन होते. परभणी जिल्ह्यांत दोन वर्षांपासून दुष्काळाची स्थिती आहे़ त्यामुळे शेती अडचणीत आली आहे. खिस्ते यांना १५ एकर जमीन आहे़ जमीन गहाण ठेवून शेतीसाठी कर्ज घेतले होते़ शुक्रवारी खिस्ते हे नेहमीप्रमाणे घराच्या माडीवर झोपण्यासाठी गेले. शनिवारी सकाळी बराच वेळ झाला तरीही ते झोपेतून न उठल्याने घरच्या मंडळींनी माडीवर जाऊन पाहिले असता, त्यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले.सततच्या नापिकीला कंटाळून खिस्ते यांनी जीवन संपविल्याची माहिती त्यांचे भाऊ श्रीहरी खिस्ते यांनी बोरी पोलिसांना दिली़ त्यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ खिस्ते यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, चार मुली, भाऊ असा परिवार आहे़ खिस्ते यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी निवळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बबनराव लोणीकर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)चार शेतकऱ्यांची आत्महत्या नापिकी आणि कर्जबाजारीमुळे परभणीत आणखी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा येथे भानुदास नागोराव कल्हारे व सेलू तालुक्यातील डासाळा येथील बापूराव लक्ष्मणराव बागल (४०) यांनी नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली़ रवळगाव येथील सुभाष काशीनाथ फुलपगारे (३५) यांनी कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शनिवारी गळफास घेतला. तर वाशिम जिल्ह्यातील सावंगा जहागीर येथील शांतीराम गोदमले (३७) यांनीही गळफास घेऊन जीवन संपविले.