शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘एमआयएम’ची नोंदणी रद्द !

By admin | Updated: July 14, 2016 04:11 IST

आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्याने निवडणूक आयोगाने ओवैसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची नोंदणी रद्द केली आहे

मुंबई : आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्याने निवडणूक आयोगाने ओवैसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची नोंदणी रद्द केली आहे. त्यामुळे या पक्षाला फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेसह कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवता येणार नाही. शिवाय, १९१ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांनादेखील असाच फटका बसला आहे. निवडणूक आयोगाकडे एकूण ३५९ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यात १७ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश असून उर्वरित सर्व ३४२ अमान्यताप्राप्त आहेत. या पक्षांना आयकर विवरणपत्र भरल्याची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे; परंतु ती सादर न केल्यामुळे ३२६ राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतरही मुदतीत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे १९१ पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आम्ही अपील दाखल करणार असल्याची माहिती एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी दिली. बुधवारी आयोगाने पक्षाची मान्यता रद्द केल्यानंतर आ. जलील यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. यामध्ये जलील यांनी नमूद केले की, आयोगाला हवी असलेली सर्व कागदपत्रे आमच्या हैदराबाद येथील टीमने सादर केली होती. त्यानंतरही पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आदर करीत पुन्हा आयोगाकडेच अपील दाखल करणार आहोत. आगामी महापालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याला आयोगाचे प्राधान्य असते. निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेल्या राजकीय पक्षास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी चिन्ह वाटपात प्राधान्य दिले जाते.नोंदणी रद्द केलेले राजकीय पक्षमुंबईतील २८, ठाणे/पालघरचे १५, रायगडचे ४, सिंधुदुर्ग १, नाशिकचे ८, जळगावचे १६, नंदुरबारचे २, अहमदनगरचे २०, पुण्याचे १४, सोलापूरचे ७, साताऱ्याचे ११, सांगलीचे ८, कोल्हापूरचे ७, औरंगाबादचे ७, बीडचे ३, नांदेडचे ३, जालना, लातूर २, अमरावतीचे २, अकोल्याचे २, यवतमाळचे ३, बुलडाण्याचे ५, नागपूरचे १२, वर्ध्याचे २, गोंदियाचे २ यांचा समावेश आहे.