शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

लाखो वैदर्भीय विदर्भ बंधनात

By admin | Updated: August 10, 2014 01:38 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनमंच या सामाजिक संघटनेतर्फे क्रांतिदिनी विदर्भात ‘रेल देखो बस देखो आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनाला विविध संघटनांसह प्रवासी नागरिकांनी

रेल देखो बस देखो आंदोलन : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनमंच या सामाजिक संघटनेतर्फे क्रांतिदिनी विदर्भात ‘रेल देखो बस देखो आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनाला विविध संघटनांसह प्रवासी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जय विदर्भ लिहिलेली टोपी घालून ‘विदर्भ बंधन’ बांधून घेतले. संपूर्ण विदर्भात तब्बल तीन लाख लोकांनी आपल्या हातावर ‘विदर्भ बंधन’ बांधून घेत स्वतंत्र विदर्भासाठी लढण्याचा संकल्प केला. जनमंचतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा सर्वदूर पोहोचवून अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने हे अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत विदर्भात सुमारे ३३ ठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. नागपुरात गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रत्येक प्रवाशांना जय विदर्भ लिहिलेली टोपी घालण्यात आली. तसेच त्यांच्या हाताला जय विदर्भ लिहिलेला बेल्ट बांधून त्यांना विदर्भ बंधनात बांधण्यात आले. प्रवासी नागरिक स्वत: उत्स्फूर्तपणे टोपी व विदर्भ बंधन बांधून घेण्यासाठी पुढाकार घेत होते. याप्रसंगी आंदोलकांनी जय विदर्भच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘विदर्भ हमारी शान है, विदर्भ हमारी जान है, हर हर विदर्भ घर-घर विदर्भ, अब की बार विदर्भ की सरकार’ या घोषणाही प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होत्या. गोंधळ आणि सप्तखंजेरीद्वारा जागर नागपुरातील मध्यवर्ती बसस्थानकावर आंदोलनादरम्यान गोंधळ आणि सप्तखंजेरीद्वारा लोकांना जागृत करण्यात आले. दसरा रोड येथील प्रभाकर सूर्यवंशी आणि ओमप्रकाश सूर्यवंशी यांनी गोंधळ सादर करून लोकांमध्ये विदर्भ राज्यासाठी लढण्याची प्रेरणा निर्माण केली. तर तुषार सूर्यवंशी या तरुणाने सप्तखंजेरीद्वारा विदर्भावरील अन्यायाचा पाढा वाचून लोकांना स्वतंत्र विदर्भासाठी प्रेरित केले. प्रेमलाल सूर्यवंशी, पांडुरंग अहिरकर, निवृत्ती आजनकर, अभिराज अहिरकर यांनी त्याला साथ दिली.