शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाव्यतिरिक्त विवाह सोहळय़ांवर लाखो रुपयाची उधळण

By admin | Updated: August 11, 2015 22:46 IST

शुभमंगल सामुहिक विवाह योजनेला प्रतिष्ठेचे ग्रहण.

नीलेश शहाकार/बुलडाणा: शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतील लाभधारकांनी शासनाकडून प्राप्त होणार्‍या अनुदानाव्यतिरिक्त कपडे, दागिणे, आहेर, जेवण, पुजा, वाहन आदींवर लाखोचा खर्च केल्याचे उघड झाले आहे. या योजनेच्या स्थिती व अंमलबजावणीबाबत राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने ४ जून रोजी अहवाल तयार केला होता. हा अहवाल आता प्रसिद्ध करण्यात आला असून, यामध्ये शुभमंगल योजनेचे अनुदान घेऊनही अनेकांनी विवाह सोहळय़ांमध्ये अवास्तव खर्च केल्याचे समोर आले आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबांवर मुलीच्या विवाहाचा आर्थिक बोजा पडू नये, यासाठी राज्य शासनाने २00८ साली शुभमंगल सामूहिक विवाह योजना सुरू केली. २0११ मध्ये या योजनेत काही सुधारणा करून सुधारित शुभमंगल सामूहिक तसेच नोंदणीकृत विवाह योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत वधू पित्याला १0 हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. अनेक पालकांना कर्ज घेऊन मुलीचे हात पिवळे करावे लागतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकूवत असणार्‍यांना या योजनेत सहभागी करण्यात आले; मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही अनेक लाभार्थ्यांनी प्रतिष्ठेच्या हव्यासातून अनुदानाव्यतिरिक्त विवाहावर लाखो रुपयंची उधळण केल्याचे चित्र आहे. कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या सहा विभागात एकूण ५४७ लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला. या योजनेतील एकूण लाभार्थ्यांपैकी ३६६ लाभधारकांनी २५ हजाराचा खर्च, तर १३५ लाभधारकांनी ५0 हजारापर्यत खर्च केला. ३५ लाभधारकांनी ५0 हजार ते १ लाखापर्यंत, तर ११ लाभार्थ्यांनी १ लाखापैक्षा जास्त वैयक्तीक खर्च या योजनेतील विवाह सोहळय़ांमध्ये केल्याचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमुद केले आहे.

*कर्ज घेऊन केले विवाह

           समारंभ योजनेत सहभागी ३६१ लाभार्थ्यांनी विवाहासाठी लागणारा अतिरिक्त खर्च स्वत:च्या उत्पन्नातून केला. १२९ लाभार्थ्यांनी नातेवाईकांकडून पैसे उसणे घेतले. ५७ लाभार्थ्यांनी लग्नासाठी सावकारांकडून कर्ज घेवून लग्नाचा अतिरिक्त खर्च भागवला. योजनेत सहभागी १६ टक्के लाभार्थ्यांनी तर मुलींच्या विवाहासाठी हुंडा दिल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.