शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

खंडित वीजपुरवठ्यामुळे कोट्यवधींचे नुकसान

By admin | Updated: July 4, 2016 02:00 IST

एमआयडीसीतील ‘टी ब्लॉक’मध्ये रविवारी सकाळी सात वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

भोसरी : एमआयडीसीतील ‘टी ब्लॉक’मध्ये रविवारी सकाळी सात वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता. कामगारांना बसून पगार द्यावा लागला व उत्पादनही ठप्प झाले. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.एमआयडीसीतील टी ब्लॉकमध्ये ५०० ते ६०० युनिट आहेत. सर्वच ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्योजकांचे नुकसान झाले. सकाळी सात वाजल्यापासून महावितरणाच्या अधिकाऱ्यांना कळवूनसुद्धा सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. काम सुरू आहे, थोड्या वेळात वीज येईल, अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत होती. विद्युत महावितरणकडून दररोज एमआयडीसीतील कोणत्या ना कोणत्या भागात वीजपुरवठा खंडित केला जातो. तसेच अनेक वेळा अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनसुद्धा तीन ते चार तास वीजपुरवठ्यापासून वंचित राहावे लागते, असे आरोपही उद्योजकांनी केले. महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. एल. शिंदे म्हणाले, तांत्रिक कारणामुळे बिघाड झाली होती. वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येणार आहे. (वार्ताहर)> टी ब्लॉकमध्ये सकाळी सात वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. येथे सुमारे ६०० युनिट आहेत. उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे अधिकारी केवळ चालढकल करतात. एमआयडीसीत प्रत्येक भागात दररोज असे प्रकार घडतात. महावितरणकडून दुर्लक्ष केले जाते.- संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना