शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चेक न वटण्याच्या लाखो खटल्यांचे होणार स्थलांतर

By admin | Updated: August 5, 2014 03:28 IST

चेक न वटविता परत करणारी बँक ज्या ठिकाणी असेल फक्त त्याच ठिकाणच्या दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला जाऊ शकतो,

मुंबई : चेक न वटल्याबद्दल ‘निगोशिएबल इन्स्ट्रमेंट्स अॅक्ट’च्या कलम 138 अन्वये दाखल केला जाणारा खटला चेक न वटविता परत करणारी बँक ज्या ठिकाणी असेल फक्त त्याच ठिकाणच्या दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला जाऊ शकतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने देशात सध्या प्रलंबित असलेल्या अशा लाखो खटल्यांच्या जागा बदलाव्या लागणार आहेत.
चेक न वटण्याचा खटला नेमका कुठे दाखल केला जाऊ शकतो याविषयी गेली 15 वर्षे लागू असलेले न्यायनिर्णय चुकीचे ठरवून न्या. टी.एस. ठाकूर, न्या. विक्रमजीत सेन आणि न्या.सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.  वटविण्यासाठी खात्यात जमा केलेला चेक धनकोची बँक न वटविता जेव्हा परत करते तेव्हाच चेक न वटण्याचा गुन्हा पूर्ण होतो. त्यामुळे इतर कोणत्याही गुन्ह्याप्रमाणोच हा गुन्हा जेथे घडला म्हणजे चेक परत करणारी बँक जेथे असेल तेथील दंडाधिकारी न्यायालयासच खटला चालविण्याचे अधिकारक्षेत्र आहे.
सध्या देशात चेक न वटण्याचे सुमारे 4क् लाख खटले प्रलंबित आहेत. हे खटले ज्यांना दिलेला चेक वटला नाही त्या ऋणकोंनी आपल्या निवासाच्या अथवा व्यवसायाच्या ठिकाणी दाखल केलेले आहेत. आता दिलेला हा निकाल यापुढे दाखल होणा:या खटल्यांना लागू करण्याचा पर्याय स्वीकारणो शक्य होते. परंतु तसे केले तर ज्या न्यायालयांना मुळात अधिकारक्षेत्रच नाही अशा न्यायालयांमध्ये हे खटले यापुढेही बेकायदेशीरपणो सुरु राहतील. शिवाय संशयित आरोपींचा खटल्यांना सामोरे जाण्यासाठी दूरवर खेटे घालण्याचा त्रसही आहे तसाच सुरु राहील, असे नमूद करीत खंडपीठाने हा पर्याय निवडला नाही.
या आदेशानुसार सध्या प्रलंबित असलेल्या ज्या खटल्यांमध्ये आरोपींना समन्स काढून ते हजर झाले आहेत 
व साक्षीपुरावे नोंदविण्याचे काम 
सुरु झाले आहे असे खटले सध्याच्याच न्यायालयांमध्ये सुरु राहतील.  (विशेष प्रतिनिधी)
 
इतर सर्व प्रलंबित खटल्यांमध्ये फिर्यादींनी दाखल केलेल्या फिर्यादी त्यांना परत केल्या जातील. ज्या न्यायालयास अधिकारक्षेत्र असेल तेथे, परत घेतलेली फिर्याद तीन महिन्यांत दाखल केली तर, ती मुदतीत दाखल झाल्याचे मानून खटल्याची कारवाई केली जाईल. अन्यथा अशा फिर्यादी मुदतबाह्य ठरून निकाली काढल्या जातील, असेही न्यायालयाने नमूद केले.