शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

राज्याकडून मलमपट्टी, केंद्राकडून जखमेवर मीठ; दूध उत्पादक शेतकरी हवालदिल 

By राजाराम लोंढे | Updated: June 29, 2024 13:30 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : पाण्यापेक्षा गाय दुधाचे भाव कमी झाल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला सावरण्यासाठी ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : पाण्यापेक्षा गाय दुधाचे भाव कमी झाल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला सावरण्यासाठी एकीकडे राज्य सरकारनेदूध अनुदान कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असताना, केंद्र सरकारने मात्र, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार केला आहे. दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतल्याने दूध पावडरची देशातंर्गत बाजारपेठ उद्ध्वस्त होणार आहे.डिसेंबर २०२३ पासून गाय दुधाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात दूध पावडरला दर नसल्याने अतिरिक्त दुधाचे करायचे काय? असा प्रश्न आहे. राज्य सरकारने जानेवारीमध्ये दोन महिने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले. मार्चनंतर दूध कमी होऊन सगळीकडेच दुधाची मागणी वाढेल आणि पावडरला चांगले भाव मिळतील, अशी दूध संघांची अपेक्षा होती. मात्र, उन्हाळ्यात दूध कमी झाले नसल्याने पावडरमधील घसरण सुरूच राहिली. गेली सात महिने ‘गोकुळ’, ‘वारणा’ व ‘राजारामबापू’ वगळता राज्यातील दूध संघांनी मनमानी पद्धतीने गाय दुधाची खरेदी केली आहे. खासगी दूध संघांकडून २२ ते २६ रुपये लिटरने खरेदी सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातून राज्य सरकारने गाय दुधाला बंद केलेले अनुदान पूर्ववत करण्याची मागणी झाली, त्यातून राज्याच्या अर्थसंकल्पात प्रतिलिटर पाच रुपये अनुदान १ मे २०२४ पासून देण्याचा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वीच केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करून १० हजार टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले आहे. अगोदरच दूध संघांची गोडावून पावडरने भरली असताना, दहा हजार टनची भर त्यात पडणार आहे. परिणामी देशांतर्गत बाजारपेठेतील पावडरच्या दरात आणखी घसरण होऊन दुधाचे दर आणखी कमी होण्याचा धोका आहे.अनुदानाचा २५ टक्केच शेतकऱ्यांना लाभराज्य सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यासाठी घातलेल्या अटी पाहता काेल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील ७५ टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित राहतात. ‘गोकुळ’ने कोल्हापुरात नियोजनबद्ध यंत्रणा राबवून जास्तीत जास्त दूध उत्पादकांना अनुदान कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केले.राज्यात ‘गोकुळ’, ‘वारणा’च आघाडीवरगाय दूध खरेदी दर पाहिले, तर राज्यात ‘गोकुळ’, ’वारणा’ व ‘राजारामबापू’ हेच संघ आघाडीवर आहेत. तिन्ही संघ ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी ३३ रुपये दर देतात.

तुलनात्मक गाय पावडरचे दर प्रतिकिलोपावडर/बटर - जून २०२३ - जून २०२४पावडर  - २९० ते ३०० - २०० ते २१०बटर  - ३९० ते ४२०  - ३३० ते ३५०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूधGovernmentसरकार