शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

दुधाचे दर वाढले!

By admin | Updated: July 6, 2016 01:21 IST

दर वाढीमुळे शेतक-यांना अल्पसा दिलासा मिळाला असून शासकीय डेअरीतील दूध संकलनात वाढ होणार आहे.

अकोला: शासनाने गाय व म्हशीच्या दुधाचे दर वाढवल्याने राज्यातील शासकीय दूध योजनकडील दूध संकलनास मदत होणार असून, पशुपालक शेतकर्‍यांचा लाभ होणार आहे; परंतु ही वाढवलेली दुधाची रक्कम तोकडी असल्याने पशुखाद्याचे बाजारातील दर बघून यात वाढ अपेक्षित असल्याचा सूर शेतकर्‍यांमध्ये आहे.पशुपालक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने १ जुलैपासून दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. गायीचे दूध सध्या २0 रुपये लीटर आहे. यामध्ये २ रुपये वाढ केली आहे म्हणजे आता गायीचे दूध घेण्यासाठी ग्राहकांना २ रुपये अधिक द्यावे लागतील; परंतु गायीच्या या दुधातील फॅटचे प्रमाण हे ३.५ तर मलई विरहित गुणप्रत (एसएनएफ) ही ८.५ प्रमाणे असणे गरजेचे आहे. म्हशीच्या दुधातही प्रतिलीटर २ रुपये वृद्धी झाली आहे. या दुधातही फॅटचे प्रमाण ६.0 तर मलई विरहित गुणप्रत ही ९.0 (एसएनएफ) असणे अनिवार्य आहे. राज्यातील शेतकर्‍यांनी शेतीला पूरक पशुपालनाचा जोडधंदा करण्यासाठी शासनातर्फे प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी काही योजना सुरू करण्यात आल्या असून, शेतकर्‍यांना शेळ्य़ा, मेढय़ा वाटपासह, गायी, म्हशींचे या अगोदर वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, दुधाचे दर वाढल्याने शासकीय दूध योजना व दूध उत्पादकांच्या संघाच्या महासंघाकडे दुधाचे संकलन वाढून अनेकांना रोजगार उपलब्घ होणार आहे. अकोला येथे राज्यातील सर्वात जुनी शासकीय दूध योजना आहे; परंतु या भागात पाहिजे त्या प्रमाणात दुग्धोत्पादनाचा व्यवसाय वाढला नाही. जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचा महासंघामार्फत दूध संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकर्‍यांना त्यासाठी प्रोत्साहित केले जाते आहे; परंतु चारा व पाण्याचा अनेक वेळा प्रश्न निर्माण होत असल्याने दुग्धोत्पादनावर त्याचे परिणाम झाल्याचे दिसून येते. सध्या पश्‍चिम विदर्भातील दूध संकलन घटले आहे. परिणमी अकोला येथील शासकीय दूध योजनेला दूध पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे परभणी व वर्धा येथून दूध आणून शहराला दुधाचा पुरवठा केला जात आहे.