शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

दूधभेसळ शोधणारे यंत्र लवकरच घरात

By admin | Updated: September 18, 2016 01:16 IST

दुग्धविकासात राज्याचा सातवा क्रमांक आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य काही महिन्यांतच बनल्याशिवाय राहणार नाही.

ठाणे : दुग्धविकासात राज्याचा सातवा क्रमांक आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य काही महिन्यांतच बनल्याशिवाय राहणार नाही. दुधातील भेसळ ही मोठी समस्या आहे. यापासून जीविताला गंभीर धोका पोहोचत आहे, हे ओळखून दुग्धविकास विभागाने कठोर पावले उचलली आहेत. सर्वसामान्य ग्राहकही आपल्या घरी ठेवू शकेल, असे भेसळ ओळखू शकणारे छोटेसे यंत्र आम्ही आणत आहे. त्यामुळे या भेसळीवर नियंत्रण येऊन गुन्हेगारांना समोर आणता येणार असल्याचे सूतोवाच पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी ठाण्यात केले. येथील गावदेवी मैदान येथे स्वाभिमानी शेतकरी दूध खरेदी केंद्राचे उद्घाटन शनिवारी जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभाग आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दूध थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. यामुळे शेतकऱ्यांना तर फायदा होईलच, शिवाय ग्राहकांनादेखील वाजवी दरात चांगले दूध मिळेल. थेट शेतकरी ते ग्राहक या योजनेंतर्गत ग्राहकांना हे दूध दिले जात आहे. बाहेरील कुठल्याही ब्रॅण्डपेक्षा राज्यातील दुधाची लोकप्रियता आम्ही वाढवणार आहोत. इतर दुधाच्या तुलनेत पाच रुपये कमी घेऊन स्वाभिमानी दूध ग्राहकांना दिले जात असल्याचेही जानकर यांनी सांगितले. सुरू केलेल्या आठवडा बाजारांच्या माध्यमातून चांगला भाजीपाला जसा मिळतोय, तशीच ज्वारी, बाजरी यासारखी धान्येदेखील थेट शेतातून या बाजारात यावीत. चांगल्या प्रतीचे चिकन-मटण हवाबंद पाकिटांमधून विक्री करून या व्यवसायातील रोजगारदेखील कसा वाढवता येईल, यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे जानकर म्हणाले. याप्रसंगी खासदार राजू शेट्टी, आमदार विनायक मेटे यांची भाषणे झाली. प्रारंभी आमदार संजय केळकर यांनी शेतकरी आठवडा बाजार ठाण्यासारख्या ठिकाणी सुरू करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली तसेच आता भाजीपाल्याप्रमाणे चांगले दूध वाजवी दरात उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)