शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये सैनिकाची आत्महत्या

By admin | Updated: October 15, 2016 04:13 IST

भारतीय सैन्य दलातील रजेवर आलेल्या सैनिकाने स्वत:च्या छातीत बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली

महाड : भारतीय सैन्य दलातील रजेवर आलेल्या सैनिकाने स्वत:च्या छातीत बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. महाड शहरातील कवे आळी परिसरात श्रेयस कॉम्प्लेक्स इमारतीतील एका फ्लॅटमध्ये या सैनिकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.राजेश पिलावरे (३२, मूळ रा. पडवी, ता. महाड) असे या मृत पावलेल्या सैनिकाचे नाव असून, तो पंजाब येथे सेवेत होता. १० आॅक्टोबरपासून राजेश पिलावरे हा रजेवर आला होता. दसऱ्यानिमित्त त्याची पत्नी दोन मुलींसह आमशेत येथे माहेरी गेली होती. त्यामुळे राजेश हा महाडमधील फ्लॅटमध्ये एकटाच होता. त्याच्या मुलीची परीक्षा असल्याने शुक्रवारी सकाळी पत्नी, दोन मुलींसह माहेरून महाड येथे परतली. त्या वेळी फ्लॅटचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी आपल्या भावाला कळवले. भाऊ आल्यानंतरही आतून दरवाजा उघडत नसल्याने त्याने याबाबत शहर पोलिसांना कळवले. बंद फ्लॅटचा दरवाजा फोडल्यानंतर फ्लॅटच्या हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात राजेशचा मृतदेह आढळला. कौटुंबिक वादातून ही आत्महत्येची घटना घडल्याचे बोलले जात असून, शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पिलावरे कुटुंबीय चार महिन्यांपूर्वीच अंबरनाथ येथून महाड शहरात राहण्यास आले होते. (वार्ताहर)