शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

भंगार अड्ड्यांमुळे एमआयडीसीत धोका

By admin | Updated: January 21, 2017 03:32 IST

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये आठ ठिकाणी मोकळ्या जागेत आणि बंद कारखान्यामध्ये भंगार व्यवसाय चालू आहे.

सिकंदर अनवारे,

दासगाव- महाड औद्योगिक वसाहतीमध्ये आठ ठिकाणी मोकळ्या जागेत आणि बंद कारखान्यामध्ये भंगार व्यवसाय चालू आहे. अनधिकृत आणि विनापरवाना अशा प्रकारे या भंगार व्यावसायिकांकडे येथील औद्योगिक वसाहत प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. २०१५ मध्ये भंगाराच्या अड्ड्यावर वायुगळती होवून पाच जणांचा मृत्यू झाला होता. मात्र या दुर्घटनेचा येथील स्थानिक प्रशासनाला विसर पडला आहे. या घटनेनंतर औद्योगिक वसाहतीतील बंद कारखान्यामध्ये सुरू असलेले भंगार अड्डे बंद केले. परंतु बंद करत असताना या भंगार व्यावसायिकांनी कमाई होणाऱ्या वस्तू घेत अनेक घातक रसायन तेथे बेवारस सोडून दिल्याने या रसायनामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये धोका निर्माण झाला आहे. महाड औद्योगिक वसाहतीमध्ये जून २०१५ मध्ये सी झोनमधील एका भंगाराच्या अड्ड्यावर अनधिकृत रसायन हाताळत असताना विषारी वायू तयार झाला होता. या वायुगळतीमध्ये निष्पाप पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सर्वच प्रशासनाची धावपळ उडाली होती. अनधिकृत थाटलेले बंद कारखान्यातील भंगार व्यवसाय आणि त्यातून केली जाणारी रसायनाची हाताळणी हा मुद्दा ऐरणीवर आला होता. या दुर्घटनेची दखल घेत महाड औद्योगिक वसाहत प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची बंद कारखाना आणि मोकळ्या जागी सुरू असलेल्या सर्व भंगार व्यवसायावर कारवाई सत्र सुरू केले. नोटिसा बजावल्या आणि या भंगार व्यावसायिकांनी औद्योगिक वसाहतीची जागा सोडून लगतच्या गावामध्ये आश्रय शोधला.२०१५ च्या या दुर्घटनाला आज दीड वर्ष पूर्ण होवून देखील भंगार अड्ड्यांवरील ही घातक रसायने तशीच पडून आहेत. औद्योगिक क्षेत्रातील सर्वच जमीन ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावावर असून कारखानदार अगर व्यावसायिक हे केवळ भाडोत्री आहेत. जागेचा वापर करण्याबाबत औद्योगिक वसाहत आणि कारखानदार यांच्यामध्ये करार केला जातो. औद्योगिक वसाहत प्रशासनाच्या संमतीशिवाय या जागा कोणालाही भाड्याने देता येत नाही, असे असताना कारखान्याच्या जागांवर भंगार अड्ड्याचा वापर आणि पोट भाडोत्री असे दोन नियमबाह्य प्रकार या ठिकाणी घडत असून देखील याची कोणतीच दखल येथील स्थानिक प्रशासनाकडून घेतली जात नाही. नियमानुसार या जागा मालकांकडून काढून घ्यावयास पाहिजे. मात्र या भंगार व्यावसायिकांपुढे प्रशासनाचे अधिकारी नामोहरम झाल्याप्रमाणे वागत आहेत.>रस्त्यालगत भंगारजिते गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत सी झोनमध्ये दोन इप्का कारखान्यासमोर एक आणि महाड औद्योगिक वसाहत कार्यालयाच्या मागच्या बाजूस, बिरवाडी रस्त्याकडे तीन असे येथे आठ भंगार अड्डे महाड औद्योगिक क्षेत्रात आहेत. मात्र जिते गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत भंगार अड्ड्याला कोणतेही संरक्षण नाही. या अड्ड्यावर केमिकल पिंप, प्लास्टीक बॅगामध्ये मोठ्या प्रमाणात ओली आणि सुकी रसायने बेवारस पडली आहेत. अशा भंगार अड्ड्यांवर कारवाईची गरज आहे. मात्र तशी मानसिकता अधिकाऱ्यांची दिसून येत नाही. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहतीचे कनिष्ठ अभियंता एस. बी. उबाले यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत काहीच माहीत नाही आणि हा विषय आमच्या अखत्यारीत नाही, असे सांगत मी तुम्हाला माहिती देवू शकत नाही, असे सांगून उबाले यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवत हात वर केले.>कामगारांची मागणी : दोन्ही कार्यालयीन अधिकारी जबाबदारी झटकत असले तरी दोन्ही कार्यालयाची जबाबदारी महाड औद्योगिक वसाहतीवर तेवढीच आहे. जिते गावचे रस्त्यावर असलेल्या या बंद भंगाराच्या अड्ड्यावर बेवारस पडलेले घातक रसायन हे मोठ्या प्रमाणात परिसराला धोकादायक आहे. याच्या चौकशीची मागणी कामगारांकडून होत आहे. >औद्योगिक वसाहतीमधील जमिनीची मालकी आणि सर्व अधिकार औद्योगिक विकास महामंडळाचे आहेत. त्यांनी या प्रकरणी कारवाई करणे अपेक्षित आहे. तसे पत्र आमच्या कार्यालयाकडून त्यांना देण्यात आले आहे. कार्यालयीन सहकार्य आमच्या कार्यालयाकडून केले जाईल. - अमित लाटे, क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड