शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचनाचे अनुदान घटविले

By admin | Updated: October 3, 2016 04:58 IST

पंतप्रधान सिंचन योजनेची राज्यात अंमलबजावणी केली जात असून या योजनेतील सूक्ष्म सिंचनाचे अनुदान घटविण्यात आले

रूपेश उत्तरवार,

यवतमाळ- पंतप्रधान सिंचन योजनेची राज्यात अंमलबजावणी केली जात असून या योजनेतील सूक्ष्म सिंचनाचे अनुदान घटविण्यात आले आहे. विदर्भ सघन सिंचन योजनेतून सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान दिले जात होते. मात्र नव्या योजनेत केवळ ४५ ते ३५ टक्केच अनुदान मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाने शेतकरी अडचणीत आला आहे. विदर्भातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी २०१२पासून २०१७पर्यंत विदर्भ सघन सिंचन योजना राबविण्यात येत होती. या योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी मोठ्या शेतकऱ्यांना ५० टक्के तर लहान शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यात येत होते. परंतु आता केंद्राने जुनी योजना बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्याऐवजी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून सूक्ष्म सिंचनासाठी असलेल्या अनुदानात ३५ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. मोठ्या शेतकऱ्यांना ३५ टक्के तर लहान शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. जुन्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी केलेले अर्जही परत करण्यात आले आहेत. यामुळे अनेक शेतकरी संतप्त झाले आहेत.सिंचनाच्या अनुदानासाठी ७०० कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतरही अनेक जिल्ह्याला अनुदान मिळाले नाही. मंगळवारी कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या अनुदानाचा विषय मांडला जाईल. - संजय राठोड, पालकमंत्री, यवतमाळविहिरींचे काम पूर्ण करीत आहे. मात्र वीजपुरवठ्याचा प्रश्न आहे. यामुळे जिल्ह्याला जितके उद्दिष्ट आहे तितकेच अनुदान मिळेल. त्यानंतरही काही प्रलंबित राहिल्यास त्याची शहनिशा करून पाठपुरावा केला जाईल.- मदन येरावार, राज्यमंत्री, यवतमाळ