शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

म्हात्रे हत्येप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा

By admin | Updated: February 16, 2017 04:49 IST

भिवंडी महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या वादातून काँग्रेसचे सभागृह नेते

भिवंडी : भिवंडी महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या वादातून काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हत्येप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात म्हात्रे यांच्या चुलतभावासह सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अंंजूरफाटा येथील ओसवालवाडीमागे समृद्धी अपार्टमेंटमधील घरात जाताना म्हात्रे यांच्यावर मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास दबा धरून बसलेल्या सात जणांपैकी एकाने अचानक गोळीबार केला. त्यात ते खाली कोसळताच दोघांनी कोयत्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या म्हात्रे यांचा ठाण्यातील रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आला. तेथून तो बुधवारी सकाळी कालवार या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आला. तेथे दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत खासदार कपिल पाटील, भिवंडीचे महापौर तुषार चौधरी व माजी आमदार योगेश पाटील यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. अंजूरफाटा येथील त्यांच्या मतदारसंघातील शेकडो स्त्रीपुरुष पाच किलोमीटरचे अंतर चालत कालवार गावात अंत्यसंस्कारासाठी पोहोचले.मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या गाडीचा चालक प्रदीप मनोहर म्हात्रे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात मनोेज म्हात्रे यांचे चुलतभाऊ प्रशांत भास्कर म्हात्रे, महेश पंडित म्हात्रे, मिथुन मोहन म्हात्रे, बंड्या ऊर्फ रणजित बळीराम म्हात्रे, चिरंजीव ऊर्फ मोटू बळीराम म्हात्रे, गणेश गोपीनाथ पाटील व मयूर ऊर्फ कोळी प्रकाश म्हात्रे या सात जणांनी संगनमताने निर्घृण हल्ला केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मनोज यांच्या जागी प्रशांत यांना पालिका निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र, ती पूर्ण न झाल्याच्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हत्येपूर्वी प्रभागातील एक वाद सोडवण्याबाबत पोलीस तक्रार करण्यास मनोज पोलीस ठाण्यात गेले होते. तेथून परतताच झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू ओढवला. (प्रतिनिधी)