शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंत’च्या जमीन खरेदीस म्हाडा तयार

By admin | Updated: May 28, 2014 00:25 IST

म्हाडाच्या संचालक मंडळाने काही अटी व शर्तींवर थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या एकूण जमिनीपैकी ११७ एकर जमीन विकत घेण्यासाठी अनुकूलता दाखविली

लोणी काळभोर : म्हाडाच्या संचालक मंडळाने काही अटी व शर्तींवर थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या एकूण जमिनीपैकी ११७ एकर जमीन विकत घेण्यासाठी अनुकूलता दाखविली आहे, यामुळे यशवंत आगामी काही दिवसांत चालू होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची चिन्हे दिसत आहेत. कोट्यवधी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी कोणत्याही वित्तीय संस्था अथवा इतरांनी मदतीचा हात पुढे न केल्याने यशवंत गेल्या तीन हंगामात बंद आहे. कारखान्यावरील कर्ज फेडून कारखाना परत चालू करण्यासाठी कारखान्याच्या मालकीच्या जमिनीपैकी आवश्यक तेवढी जमीन विकण्यास सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत ठरावाद्वारे मंजुरी दिली असल्याने गेल्या काही दिवसांपासून ही जमीन म्हाडाला घरबांधणीसाठी विकण्याचे प्रयत्न चालू होते. ही जमीन खरेदी करण्यासाठी म्हाडाने काही अटी व शर्ती घातल्या आहेत. त्यामध्ये ही जमीन शासनातर्फे संपादित होउन तिचा मोबदला दिला नसल्याची खात्री करणे. या जमिनीचा झोन निवासी विभागात रूपांतरित करण्यास कारखान्याने शासनाची तयारी व तात्त्विक मान्यता घेणे; भविष्यात कारखान्यामुळे होणारे प्रदूषण व ते टाळण्यासाठी अथवा आटोक्यात राहण्याकरिता संबंधित विभागाने हमी देणे, सदर ठिकाणी अस्तित्वात असलेल्या उच्च, मध्यम, कमी दाबाच्या विद्युतवाहिन्या कारखान्यामार्फत त्याचे खर्चाने स्थलांतरित कराव्यात. जमिनीवरील सर्व प्रकारची दायित्वे व बोजे प्रत्यक्ष खरेदीपूर्वी संपुष्टात आणावेत. म्हाडाचा हा प्रस्ताव मान्य करून अपेक्षित दराबाबतचा नवीन प्रस्ताव म्हाडास सादर करणे या अपेक्षा म्हाडाने व्यक्त केल्या आहेत. (वार्ताहर)