शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोची डेडलाइन हुकणार!

By admin | Updated: July 1, 2016 02:50 IST

बेलापूर ते तळोजा येथील पेंधर दरम्यान उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा २0१७ पर्यंत पूर्ण करण्याचे सिडकोने जाहीर केले

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- बेलापूर ते तळोजा येथील पेंधर दरम्यान उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा २0१७ पर्यंत पूर्ण करण्याचे सिडकोने जाहीर केले आहे. परंतु विविध कारणांमुळे या प्रकल्पाची रखडपट्टी सुरू आहे. प्रकल्पाच्या कामाची संथ गती पाहता सिडकोने मेट्रोसाठी दिलेली ही डेडलाइन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोने २0११ मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. नवी मुंबई मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. त्यातील बहुतांशी स्थानकांचे काम पूर्ण झालेले आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीला सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च निर्धारित करण्यात आला होता. परंतु विविध कारणांमुळे काम रखडल्याने हा खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेट्रोचा दुसरा टप्पा १0.३0 किमी लांबीचा आहे. तळोजा एमआयडीसी - कळंबोली - खांदेश्वर मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पहिल्या दोन टप्प्यांना जोडण्यासाठी तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा केवळ २ किमी लांबीचा असून त्यासाठी ५७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला डिसेंबर २0१४ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु विविध कारणांमुळे कामाचा वेग मंदावल्याने ही मुदत २0१५ व नंतर जानेवारी २0१७ पर्यंत वाढविण्यात आली. मेट्रोबरोबरच सिडकोच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैनाचा विकास आणि स्मार्ट सिटी हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प हा देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने सिडकोने सुरुवातीपासून याच प्रकल्पाला झुकते माप दिल्याचे बोलले जात आहे. याचा परिणाम म्हणून बहुप्रतिक्षित मेट्रोची रखडपट्टी सुरू आहे.सध्या बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या ११ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे जवळपास ८0 टक्के काम सुरू आहे. उर्वरित चार महिन्यात राहिलेले काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. मेट्रो मार्गासाठी बेलापूर ते पेंधर या दरम्यान ठिकठिकाणी सिमेंटचे खांब उभे करण्यात आले आहेत. तळोजा येथे मेट्रोसाठी पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु हे काम सुध्दा अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी येथे मोठी तुलई टाकण्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे रोलिंग स्टॉक, सिग्नल यंत्रणा व स्थानकांच्या कामांना ब्रेक लागला आहे. एकूणच मेट्रो प्रकल्पाच्या कामाची सध्याची गती पाहता हा प्रकल्प आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाच्या पहिल्या टेक आॅफसाठी सिडकोने २0१९ चा मुहूर्त निश्चित केला आहे. त्यामुळे या प्रकल्पावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामाची कासवगती पाहता बहुप्रतीक्षेत असलेली मेट्रो सुध्दा विमानाच्या टेकआॅफबरोबरच सुरू होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. >व्यवस्थापकीय संचालकांनी केली पाहणीव्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारताच भूषण गगराणी यांनी सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ त्यांनी मेट्रो प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. इतकेच नव्हे, तर प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट देवून पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत मेट्रोचे काम रखडणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.