शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचे १२४ किलोमीटरचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2016 02:16 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने पाच मेट्रो मार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. यात दहिसर पश्चिम ते डी.एन.नगर (मेट्रो-२ अ), डी.एन.नगर ते मानखुर्द

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने पाच मेट्रो मार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. यात दहिसर पश्चिम ते डी.एन.नगर (मेट्रो-२ अ), डी.एन.नगर ते मानखुर्द (मेट्रो-२ ब), कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो-३), वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली(मेट्रो-४) आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (मेट्रो-७) या मेट्रो मार्गांचा समावेश आहे. यातील काही प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले असून, काही प्रकल्पांचे काम नव्या वर्षात हाती घेण्यात येणार आहे.एमएमआरडीएकडून या वर्षी दहिसर पश्चिम ते डी.एन.नगर, कुलाबा-वांद्रे-सीप्झ, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. डी.एन.नगर ते मानखुर्द आणि वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो मार्गाचे काम नव्या वर्षात हाती घेण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या या प्रकल्पांमुळे दहिसर, वांद्रे पश्चिम, बीकेसी, मानखुर्द आणि ठाण्यासह अंधेरी पूर्व, घाटकोपर, मुलुंड आणि वडाळा हे परिसर एकमेकांशी जोडले जातील. मेट्रो-३ मुळे कुलाबा, काळबादेवी, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी, दादर, धारावी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळ, एमआयडीसी, सीप्झ हे परिसर एकमेकांना जोडले जातील. (प्रतिनिधी)रोजगारनिर्मितीला मिळणार चालना- मेट्रोच्या या पाच मार्गांची एकूण लांबी १२४ किलोमीटर असेल. यावर 61,289कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या मार्गांचा उपयोग ५० लाखांहून अधिक मुंबईकरांना होईल. शिवाय ५० हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध होईल, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.मेट्रोच्या या पाच मार्गांमुळे रेल्वेच्या डब्यातील गर्दी ३५ ते ४० टक्क्यांनी कमी होईल. अपघात कमी होतील. रस्त्यावरील वाहनांत ३५ ते ४० टक्क्यांनी घट होईल. प्रवासाच्या वेळेत ३० ते ५० मिनिटे बचत होईल. ध्वनी आणि वायुप्रदूषणात घट होईल. दररोज १० लाख लीटर इंधनाची बचत होईल.- प्रवीण दराडे, अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए