शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत कडकडीत बंद

By admin | Updated: September 27, 2016 02:06 IST

मोहरी येथील गतिमंद व अपंग अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याच्या निषेधार्थ सोमवारी पाथर्डीत कडकडीत बंद पाळून तहसील कार्यालयावर

पाथर्डी (जि. अहमदनगर) : मोहरी येथील गतिमंद व अपंग अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याच्या निषेधार्थ सोमवारी पाथर्डीत कडकडीत बंद पाळून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या वतीने पाच शाळकरी विद्यार्थिनींनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानंतर माणिकदौंडी चौकात वसंतदादा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरोपीला कडक शासन करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केला. शेकडो सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार करीत खडे बोल सुनावले. रविवारी दुपारी मोहरीतील गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. त्याबाबत पीडित मुलीचे नातेवाईक तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपीच्या मुलाने व नातेवाइकांनी आमच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असे पीडित कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या धमकी व घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी आंबेडकर चौकापासून मूक मोर्चा निघाला. मोर्चाच्या अग्रभागी शाळकरी विद्यार्थिनी होत्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे यांच्याशी मोर्चेकऱ्यांनी चर्चा केली. (प्रतिनिधी)आरोपीला कोठडी- पाथर्डी पोलिसांनी सोमवारी आरोपी अशोक सदाशिव वाल्हेकर याला न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ सतीश पाटील यांनी युक्तिवाद केला़ ते म्हणाले, आरोपीची पूर्ण चौकशी करायची असून, घटनेत आणखी कुणाचा समावेश आहे त्याचाही पोलिसांना शोध घ्यायचा आहे. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.पीडित मुलीवर उपचारपीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे़ सोमवारी शिवसेना नेत्या आ़ नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन मुलीच्या प्रकृ तीविषयी माहिती घेतली.