शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

मेटे, जानकरांनाही ‘संघशिस्त’ भंगाची नोटीस!

By admin | Updated: December 19, 2015 00:30 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्बोधन वर्गाला गैरहजर राहिल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्री व २० आमदारांना भारतीय जनता पक्षाने

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्बोधन वर्गाला गैरहजर राहिल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्री व २० आमदारांना भारतीय जनता पक्षाने शिस्तभंगाची नोटीस पाठविली आहे. विशेष म्हणजे, रासपचे महादेव जानकर आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनाही तसे पत्र गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सहयोगी पक्षांनाही संघशिस्त सक्तीची आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संघातर्फे उपराजधानीत आलेले भाजपचे आमदार व मंत्र्यांसाठी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित स्मृतिमंदिर येथे उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गास सर्वांची उपस्थिती रहण्यासाठी भाजपाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी सर्व आमदारांना याची कल्पना दिली होती. भाजपातर्फे वर्गस्थानावर उपस्थितांची हजेरीही घेण्यात आली. वर्गाच्या वेळी १३९ आमदारांपैकी ११७ जणच उपस्थित होते. अनुपस्थित असलेल्या २२ जणांमध्ये परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख व आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीश आत्राम यांचादेखील समावेश होता. याची पक्षातर्फे गंभीर दखल घेण्यात आली व या सर्व आमदारांना तंबी देणारे पत्र पाठविण्यात आले. पक्षाने कळवूनदेखील अनुपस्थित राहणे हे पक्षशिस्तीच्या दृष्टीने योग्य नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे.गैरहजर राहिलेले सदस्यविजय देशमुख (राज्यमंत्री), अंबरीश आत्राम (राज्यमंत्री),आशिष देशमुख, कृष्णा खोपडे, देवयानी फरांदे, अनिल गोटे, लखन मलिक, समीर मेघे, लक्ष्मण पवार, सुभाष देशमुख, अमल महाडिक, मितेश भांगडिया, विनायक मेटे, सुधीर पारवे, भारती लव्हेकर, राहुल अहेर, प्रभुदास भिलावेकर, संतोष दानवे, योगेश टिळेकर, सुधीर गाडगीळ, रामनाथ मोते, महादेव जानकर.नोटीस नव्हे तंबी!भाजपाच्या २२ आमदारांना नोटीस दिली असल्याची चर्चा दिवसभर विधिमंडळात होती. यासंदर्भात संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांना विचारणा केली असता, पक्षशिस्त कायम राहावी व पुढे असे प्रकार होऊ नये यासाठी सर्वांना उद्देशून असे पत्र काढले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु नोटीस ही वैयक्तिकपणे देण्यात येते. भाजपातर्फे आमदारांना नोटीस देण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.जानकर, मेटेंच्या समावेशाने आश्चर्यया पत्रामध्ये रासपचे महादेव जानकर व विनायक मेटे यांचे नावदेखील नमूद आहे. हे दोघेही भाजपाचे सदस्य नसून संघाशी यांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे त्यांचे नाव यात कसे आले याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. परंतु आम्ही दोघेही विधानपरिषदेत तांत्रिकदृष्ट्या भाजपाच्या ‘कोट्या’त असल्यामुळे आमचे नाव यात टाकण्यात आले आहे, अशी सारवासरव जानकर यांनी केली.