पालघर : पालघरमधील भोला तिवारी कुटुंबीयांचा ‘फुलाचा राजा’ हा इको फ्रेंडली गणपती ची फुलांची विलोभनीय आरासने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून पर्यावरणाचा पुरस्कार करण्या बरोबरच भ्रूण हत्या आणि बेटी बचावचा संदेश देत त्यांनी समाजप्रबोधनाची कास धरली आहे.पालघर पोलीस स्टेशन अंतर्गत १०२५ खाजगी गणपतीची स्थापना करण्यात आली असून पालघरच्या भाजी मार्केटमध्ये मागील २४ वर्षांपासून भोला, सोमनाथ, संजय, सुरेंद्र हे चार भावांसह संपुर्ण कुटुंबीय गणेशोत्सव साजरा करीत आहेत. त्यांचा फुलाचा राजा हा दगडू शेठ गणपतीच्या मूर्तींची प्रतिकृती आलेला गणपती आणि त्याला गुलाब, जरबेरा, आॅरकेड, कारमेशन, गेल्याडी आदी फुलांची सजावट करण्यात आली असल्याने महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांसह महिलांच्या आकर्षणाचा हा गणपती केंद्रबिंदू बनला आहे. अगदी वापी, सिल्वासा, वलसाड इ. भागातून भक्त दर्शनाला येत असल्याचे सुरेंद्र तिवारी यांनी सांगितले.मोरासह गणपतीचे वाहन उंदीर रथ खेचीत असून संपूर्ण सजावट पर्यावरण पूरक साहित्याने सजविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>लाखोंच्या दक्षिणेचा वापर गरजू विद्यार्थ्यांसाठीबाप्पापुढे रोज वेगवेगळी भजन मंडळी, कवी संमेलन, अथर्वशीर्षचे पठण केले जाते. फटाके, गुलाल वापरण्यावर बंदी असून डीजे लाही त्यांनी थारा दिलेला नाही. भ्रूण हत्या,बेटी बचाव, स्वच्छता, शिक्षण यांचे महत्व पटवून देण्यासाठी बॅनर द्वारे समाज प्रबोधनाचा प्रयत्न केला जात आहे. तिवारी कुटुंबियांच्या गणपतीला मिळालेल्या लाखो रु पयांचा दक्षिणेचा वापर गरजू विद्यार्थीच्या शिक्षणासाठी, आजारी रुग्णांच्या औषधोपचारासाठी केला जात असल्याचे तिवारी यांनी सांगितले. आपण सर्व गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा करीत असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरतीचा सन्मान ही दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पालघरमधील ‘फुलाचा राजा’ने दिला ‘बेटी बचाव’चा संदेश
By admin | Updated: September 10, 2016 02:53 IST