शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा पारा @ ३५.२

By admin | Updated: October 20, 2016 01:56 IST

आॅक्टोबर हीटचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच आहे.

मुंबई : आॅक्टोबर हीटचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी, मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. मान्सूनच्या परतीनंतर २७ अंशावर घसरलेले कमाल तापमान ३५ अंशावर पोहोचले आहे. बुधवारी शहराचे कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, आठवडाभर कमाल तापमानाचा आलेख चढाच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या ४ ते ५ दिवसांत नैऋत्य मौसमी पाऊस देशाच्या उर्वरित भागातून परतण्यासाठी स्थिती अनुकूल आहे. मागील चोवीस तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले आहे. संपूर्ण राज्यातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले असून, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.मुंबईच्या कमाल तापमानात मागील तीन दिवसांपासून सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. गणेशोत्सवासह नवरात्रौत्सवात पडलेल्या पावसामुळे, शहराचे कमाल तापमान २७ अंशावर घसरले होते. मात्र, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येऊ लागली. ३२, ३३ आणि ३४ अंशापर्यंत मजल मारलेल्या कमाल तापमानाने बुधवारी थेट ३५ अंशाचा पारा गाठला. विशेषत: सोमवारच्या ढगाळ वातावरणानंतर हवामानात झालेल्या बदलाने मुंबई आणखी तापली आणि वाढत्या आॅक्टोबर हीटने मुंबईकर घामाघूम झाल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)>राज्यासाठी अंदाज२० आॅक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.२१-२२ आॅक्टोबर : दक्षिण कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.२३ आॅक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.मुंबईसाठी अंदाज२०-२१ आॅक्टोबर : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २४ अंशाच्या आसपास राहील.