शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणबाबत मानसिकता ब्रिटिशांप्रमाणे

By admin | Updated: October 15, 2016 04:21 IST

मेळघाट व राज्यातील अन्य आदिवासी विभागांना कुपोषणाच्या समस्येने वेढले असताना त्यावर उपाय म्हणून गेली आठ वर्षे उच्च न्यायालय राज्य सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर

मुंबई : मेळघाट व राज्यातील अन्य आदिवासी विभागांना कुपोषणाच्या समस्येने वेढले असताना त्यावर उपाय म्हणून गेली आठ वर्षे उच्च न्यायालय राज्य सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर आदेश देत आहे. मात्र संवेदनशीलता हरवलेल्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या व सनदी अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत बदल होत नसल्याने उच्च न्यायालयाने हतबलता व्यक्त केली. ब्रिटिशांना आदिवासी समाजाशी काहीही घेणे-देणे नव्हते, आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मंत्र्यांना आणि सनदी अधिकाऱ्यांनाही त्यांच्याशी काहीही घेणे-देणे नाही. आभाळच फाटले आता कुठे कुठे शिवणार? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने हतबलता व्यक्त केली. या सुनावणीवेळी ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीतील कुपोषणावरील लेखही न्यायालयासमोर सादर करण्यात आले. ‘ब्रिटिश सरकारने आदिवासी समाजाच्या समस्या जाणून घेण्यात कधीच रस दाखवला नाही. स्वातंत्र्य मिळाले असले तरी तीच मानसिकता कायम आहे. संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी व सनदी अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे. कधी कधी आम्हाला वाटते, की आम्ही जे करत आहोत ते व्यर्थ आहे,’अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारापुढे हतबलता व्यक्त केली.मेळघाट व राज्याच्या अन्य आदिवासी विभागांतील कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारला योग्य ते आदेश देण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होती. शुक्रवारच्या सुनावणीत सरकारतर्फे अ‍ॅड. नेहा भिडे यांनी खंडपीठापुढे आदिवासी विभागांसाठी मंजूर  करण्यात आलेल्या निधीची माहिती उच्च न्यायालयाला दिली. मेळघाट व आदिवासी विभागांसाठी आत्तापर्यंत किती निधी मंजूर करण्यात आला व कशा प्रकारे खर्च करण्यात आला, याची माहिती अ‍ॅड. भिडे यांनी दिली. अ‍ॅड. साने यांनीही कुपोषणामुळे अधिक बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. राज्य सरकार खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या या दाव्याला दुजोरा देण्यासाठी हे लेख उच्च न्यायालयात सादर केले. माझ्या म्हणण्यावर विश्वास नसेल, तर या दिग्गजांच्या म्हणण्याकडे तरी न्यायालयाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी म्हटले. उच्च न्यायालयाने त्यानंतर वास्तविकता भयाण असल्याचे म्हटले. राज्य सरकारनेही हे लेख वाचावेत, अशी सूचनाही खंडपीठाने सरकारला केली. कोट्यवधी रुपयांचा निधी योग्य गोष्टींसाठी खर्च न केल्याचे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने हा निधी सामान्य नागरिकांच्या करातून मिळत असल्याने ज्या गोष्टीसाठी निश्चित करण्यात आला आहे, त्यासाठी खर्च करावा, असा टोलाही सरकारला लगावला. न्यायालयाने सरकारला आदिवासी विभागांना देण्यात येणाऱ्या निधीची तसेच आश्रमशाळांच्या स्थितीची माहिती २५आॅक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)