शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्प राज्यात अव्वल

By admin | Updated: November 13, 2015 00:41 IST

केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रबंध, कौशल्य व मूल्यमापनात सरस असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.

गणेश वासनिक, अमरावतीकेंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रबंध, कौशल्य व मूल्यमापनात सरस असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. परिणामी राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेळघाटला अव्वल दर्जा प्रदान करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या प्रकल्पात ६५ वाघ असल्याची नोंद देखील करण्यात आली आहे.२०१२ ते २०१४ या वर्षांत या प्रकल्पात वाघांचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आला. त्यानुसार या चार वर्षांत पूर्णपणे वाढ झालेले ४२ तर २३ बछड्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. अत्यंत सूक्ष्म आणि काटेकोर अभ्यासाअंती सहा वाघिणींनी १४ बछड्यांना जन्म दिला असून हे सर्व बछडे जीवंत असल्याचे कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये कैद झाले आहे. मेळघाटचे जंगल दऱ्या-खोऱ्यांनी युक्त असल्यामुळे वाघांचे संरक्षण आणि संगोपनासाठी पोषक आहे. प्रकल्पातील वाघिणींची प्रजननक्षमता दोन ते तीन असल्याचे महत्वपूर्ण मानले जात आहे. वाघिणीने केवळ ४० टक्के बछड्यांचे संगोपन होते, हा आजतागायतचा अनुभव आहे. मात्र, मेळघाटात ६ वाघिणींचे १४ बछडे सुरक्षित असणे हे देशातील पहिले उदाहरण मानले जात आहे. दुसरीकडे प्रकल्पाने वाघांचे संगोपन आणि संरक्षणासाठी सूक्ष्म नियोजन करुन वेगळा पायंडा रचला आहे. वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य स्थळी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाघांच्या सर्व हालचाली सहजतेने टिपता येतात. वाघिणीने बछड्यांना जन्म दिल्यानंतर तिचे आश्रयस्थळ, शिकारीचा वेळ, बछड्यांच्या हालचाली या कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाघिणीसह बछड्यांचे संगोपन, संरक्षण करणे व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुकर झाले.२०१४ साली दिल्ली येथील राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था यांनी या प्रकल्पाचे क्षेत्र संचालक दिनेशकुमार त्यागी यांना उत्कृष्ट प्रबंध, कौशल्य व मूल्यमापनासाठी राज्यात अव्वल असल्याबाबत पुरस्कार देवून गौरविले आहे. या दोन्ही संस्थांनी केलेल्या चाचणीत प्रकल्पाने राज्यात अव्वल तर देशात सहाव्या क्रमांकाचा नावलौकिक प्राप्त केला आहे. मेळघाटात सुमारे ६५ वाघांची नोंद होणे, ही बाब निश्चितच आनंददायी मानली जात आहे.शासन, प्रशासनस्तरावर वाघ वाचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे हे यशस्वी पाऊल मानले जात आहे.