शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महासंचालक नागपुरात, शुक्रवारी घेणार बैठक

By admin | Updated: July 21, 2016 23:25 IST

राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रवीण दीक्षित गुरुवारी रात्री नागपुरात आले. त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी इमामवाड्यातील

नागपूर : राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रवीण दीक्षित गुरुवारी रात्री नागपुरात आले. त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी इमामवाड्यातील शाळकरी मुलीचे अपहरण आणि बलात्काराच्या खळबळजनक प्रकरणाच्या निमित्तानेच पोलीस महासंचालक नागपुरात आले असावे, असा तर्क लावला जात आहे. डीजीपी दीक्षित आज रात्री ८ च्या सुमारास नागपुरात आले. त्यांच्या अचानक आगमनामुळे शहर पोलीस दलात खळबळ निर्माण झाली. मुंबईत अधिवेशन सुरू असताना पोलीस महासंचालकांनी नागपुरात येण्याच्या घडामोडीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. कोपर्डी प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असताना नागपुरात वर्दळीच्या मेडीकल चौक परिसरातून शाळकरी मुलीला दुचाकीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण वादळ निर्माण करू शकते. तसे संकेत मिळाल्यानेच डीजीपी दीक्षित नागपुरात आल्याचे बोलले जाते. या संदर्भात येथील शिर्षस्थ अधिका-यांशी संपर्क साधला असता, पुर्वनियोजित कार्यक्रमानुसारच ते नागपुरात आल्याचे अधिका-यांनी सांगितले. दरम्यान, डीजीपी दीक्षित शुक्रवारी सकाळी वरिष्ठ पोलीस अधिका-यांशी चर्चा करून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. ईमामवाडा पोलीस ठाण्यातही ते भेट देण्याची शक्यता आहे.

आ. गजभियेंनी नोंदविला निषेध राष्टवादीचे विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून, आपण हे प्रकरण विधीमंडळात लावून धरणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. २४ तास होऊनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही, ही बाब लाजिरवाणी असल्याचेही आ. गजभिये म्हणाले.